Stocks in Focus | धमाकेदार रिटर्न्स, 5 दिवसात 67 टक्के परतावा, गुंतवणूकदारांना मजबूत फायदा, हे स्टॉक्स खरेदीसाठी ऑनलाईन गर्दी

Stocks in Focus | 5 ऑगस्ट रोजी सलग तिसऱ्या आठवड्यात शेअर बाजार निर्देशांक 1.4 टक्क्यांनी वधारले आहे. रिझव्र्ह बँकेने रेपो दरात केलेली वाढ आणि तैवानवरून चीन आणि अमेरिका यांच्यातील वाढत्या राजकीय तणावाच्या आणि संभाव्य युद्ध अशी खतरनाक पार्श्वभूमी असून देखील शेअर बाजारत वाढ होत आहे. जुलै महिन्यात आलेले वाहन विक्रीचे चांगले आकडे, आणि परकीय गुंतवणूकदारांची सातत्यपूर्ण खरेदी तसेच घसरलेले व्याजदर आणि आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमती यामुळे बाजारातील वाढीला आधार मिळाला आहे.
BSE सेन्सेक्स मध्ये 800 अंकांची वाढ झाली असून ते 58,388 वर आणि निफ्टी 50 निर्देशाकांत 239 अंकांची वाढ झाली असून ते 17,397 वर पोहोचले आहे. तर निफ्टी मिडकॅप-100 आणि स्मॉलकॅप-100 निर्देशांकात अनुक्रमे 2.1 टक्के आणि 1.6 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे . रिअल्टी वगळता सर्व क्षेत्रीय निर्देशांकात वाढ झालेली दिसून येते. यामध्ये आयटी, मेटल, ऑटो आणि ऑइल अँड गॅसमध्ये चांगला फायदा झाला. गेल्या दीड महिन्यात 14 टक्क्यांनी वधारल्यानंतर, गेल्या आठवड्यात वाढत्या अस्थिरतेमुळे बाजारात थोडी विक्री झाली. दरम्यान, 5 स्टॉकनी गुंतवणूकदारांना धमाकेदार परतावा दिला आहे.
सुबेक्स लिमिटेड :
सुबेक्स ही लघु बाजार भांडवल कंपनी आहे. त्याचे बाजार भांडवल सध्या 2,467.19 कोटी रुपये आहे. मागील आठवड्यातील 5 ट्रेडिंग सेशनमध्ये, हा स्टॉक जवळजवळ 67 टक्क्यांनी वाढला आहे. हा स्टॉक मागील 5 दिवसांपूर्वी 26.30 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 43.90 रुपयांपर्यंत वाढला आहे. शुक्रवारी दिवसा अखेर स्टॉक 10 टक्क्यांच्या वाढीसह 43.90 रुपयांवर बंद झाला. 67 टक्के परताव्यासह, गुंतवणूकदारांचे 1 लाख रुपये सुमारे 1.67 लाख रुपये झाले आहे. पण लक्षात ठेवा की छोट्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना जास्त जोखीम असते. त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
बर्नपूर सिमेंट :
बर्नपूर सिमेंट कंपनीच्या स्टॉक ने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला. या कंपनीचा शेअर 4.23 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 6.10 रुपयांवर पोहोचला आहे. अशा प्रकारे, गुंतवणूकदारांना कंपनीच्या शेअर्समधून 44.21 टक्के नफा मिळाला. या कंपनीचे बाजार भांडवल 52.11 कोटी रुपये आहे. 5 दिवसात मिळणारा 44.21 टक्के परतावा FD सारख्या गुंतवणूक पर्यायांपेक्षा कितीतरी पटीने जास्त आणि चांगला आहे. शुक्रवारी दिवसा अखेर शेअरमध्ये 9.7 टक्क्यांची घसरण झाली आणि शेअर 6.10 रुपयांवर बंद झाला.
कोचीन मिनरल :
आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा देण्यात कोचीन मिनरल्सही पुढे आहे. मागील आठवड्यात या स्टॉकने 41.13 टक्के परतावा दिला आहे. मागील आठवड्यात शेअर 115.85 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 163.50 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच या स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 41.13 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 128.02 कोटी रुपये आहे. शुक्रवारी दिवसा अखेर हा शेअर 19.43 टक्के वाढला होता आणि ह्या वाढीसह 163.50 रुपयांवर बंद झाला.
रॅफनॉल रेजिन्स :
ह्या स्टॉक ने मागील आठवड्यात आपल्या गुंतवणूकदारांना भरघोस नफा दिला आहे. ह्या कंपनीचा स्टॉक 39.95 रुपयांवर ट्रेड करत होता toh आता 55 रुपयांवर गेला आहे. या शेअर मधून गुंतवणूकदारांना काही दिवसातच 37.67 टक्के परतावा मिळाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 16.86 कोटी रुपये आहे. शुक्रवारी, दिवसा अखेर शेअर मध्ये सुमारे 1 टक्क्यांची पडझड पाहायला मिळाली आणि ह्या कमजोरीसह स्टॉक 54.55 रुपयांवर बंद झाला.
एमएफएल इंडिया :
एमएफएल इंडियानेही मागील आठवड्यात गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा मिळवून दिला होता. त्याचा शेअर 1.02 रुपयांवर ट्रेड करत होता तो आता 1.39 रुपयांवर पोहोचला आहे. म्हणजेच स्टॉक मधून गुंतवणूकदारांना 36.27 टक्के इतका जोरदार नफा मिळाला आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 50.08 कोटी रुपये आहे. शुक्रवारी ह्या शेअरमध्ये 9.74 टक्के पडझड पाहायला मिळाली होती आणि ह्याच कमजोरीसह स्टॉक दिवसा अखेर 1.39 रुपयांवर बंद झाला.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Stocks in Focus amazing shares which has given huge profits to its shareholders on 9 August 2022.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
RVNL Share Price | मल्टिबॅगर PSU आरव्हीएनएल कंपनीबाबत अपडेट, स्टॉक प्राईस फुल स्पीड पकडणार – Nifty 50
-
IRB Infra Share Price | आयआरबी इंफ्रा शेअर वर्षभरात 23 टक्क्यांनी घसरला, पण HDFC सिक्युरिटीज ब्रोकरेज बुलिश – Nifty 50
-
Mutual Fund SIP | महिन्याला करा केवळ 6000 रुपयांची गुंतवणूक, 1 कोटींच्या घरात परतावा कमवाल, संपूर्ण कॅल्क्युलेशन
-
TATA Punch EV | धमाका ऑफर, 19,500 रुपयांच्या मासिक EMI वर घरी घेऊन या 'टाटा पंच EV, संधी सोडू नका
-
Income Tax on Salary | नवीन टॅक्स प्रणालीनुसार 1,275,000 रुपयांचे पॅकेज आणि अतिरिक्त इन्सेन्टिव्ह वर किती टॅक्स लागेल
-
RVNL Share Price | रेल्वे शेअर्स तेजीत, RVNL शेअर फोकसमध्ये आला, कंपनीबाबत फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL
-
HAL Share Price | डिफेन्स कंपनीचा मल्टिबॅगर शेअर फोकसमध्ये, तेजीचे संकेत, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: HAL
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग सह टार्गेट प्राईस जाहीर - NSE: TATAPOWER
-
SBI Mutual Fund | SBI म्युच्युअल फंडाच्या 'या' 4 योजना देत आहेत मजबूत परतावा, गुंतवणूकदारांसाठी फायद्याच्या योजना
-
MTNL Share Price | सरकारी कंपनीचा स्वस्त शेअर तुफान तेजीत, आज 19 टक्क्यांचा अप्पर सर्किट, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: MTNL