
EPFO Money | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी अंतर्गत येणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांच्या पगारावर वाढ करण्यात येणार आहे. काही दिवसांआधी सरकारने या गोष्टींची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला होता. लवकरच सरकार यावर निर्णय घेणार आहे आणि कर्मचाऱ्यांच्या वेतन मर्यादित वाढ करणार.
ज्या कर्मचाऱ्यांचा बेसिक पगार 18000 रुपये आहे त्यांना वेतन वाढीनंतर कमाल 26 हजार रुपये वाढवून मिळतील. त्याचबरोबर ज्या कर्मचाऱ्यांना 15000 बेसिक पगार आहे त्यांना पगारवाढीनंतर दरमहा 21000 रुपये मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर ईपीएफओ संघटनेची जोडल्या जाणाऱ्या सर्व कंपन्यांना नियमांतर्गत म्हणजेच 20 कर्मचाऱ्यांपासून 10 ते 15 कर्मचारी केले जातील.
याआधी 2014 रोजी करण्यात आला होता बदल :
ईपीएफ कर्मचाऱ्यांचा पगार 2014 रोजी वाढवण्यात आला होता. याआधी सर्व कर्मचाऱ्यांना 6500 रुपयांचा पगार मिळायचा. हा पगार वाढवून थेट 15000 रुपये करण्यात आला होता. त्यानंतर तब्बल 10 वर्षानंतर कर्मचाऱ्यांना 15000 बेसिक पगारावरून डायरेक्ट 21000 रुपयांची हाईक मिळणार आहे. श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मंडावीया हे लवकरच याबाबत निर्णय देणार आहेत.
कर्मचाऱ्यांच्या योगदानात होणार वाढ :
सरकारकडून पगारवाढीची मंजुरी मिळाल्यानंतर कर्मचारी तसेच नियोक्तांकडून होणाऱ्या योगदानामध्ये वाढ होणार आहे. सध्या हे योगदान 12 टक्क्यांनी सुरू आहे. त्याचबरोबर कंपनी आणि नियोक्ता 8.33 ईपीएस आणि 3.67% ईपीएफ खात्यात जमा करतात. पगारवाढीनंतर ही वेतन सीमा देखील वाढेल. ईपीएफओकडून कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर अनेक कर्मचाऱ्यांना पगारवाढची उत्सुकता लागलेली.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.