14 December 2024 6:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Bonus Shares | फ्री शेअर्स मिळवा! या शेअरने 1 महिन्यात 50 टक्के परतावा दिला, संयम श्रीमंत करेल

Bonus Shares

Bonus Shares | अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स इंडिया लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये आज जबरदस्त विक्रीचा दबाव पाहायला मिळाला आहे. या कंपनीने नुकताच आपल्या गुंतवणूकदारांसाठी दोन मोठ्या घोषणा केल्या होत्या. अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स कंपनीने आपल्या शेअरधारकांना प्रति शेअर 2 रुपये लाभांश वाटप करण्याची घोषणा केली होती. आज गुरूवार दिनांक 1 फेब्रुवारी 2024 रोजी अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स कंपनीचे शेअर्स 3.11 टक्के घसरणीसह 154.40 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. Advani Hotels Share Price

कंपनीने सेबीला दिलेल्या माहितीनुसार ज्या गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात 9 फेब्रुवारी 2024 पूर्वी कंपनीचे शेअर्स असतील, त्यांना कंपनी लाभांश वाटप करेल. आणि 26 फेब्रुवारीपासून गुंतवणूकदारांच्या बँक खात्यात लाभांश जमा केला जाईल. याशिवाय अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स कंपनीने आपल्या विद्यमान पात्र गुंतवणुकदारांना मोफत बोनस शेअर वाटप करण्याची घोषणा केली आहे. यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाची मंजुरी घेण्यात आली आहे.

मात्र, कंपनीने अद्याप बोनस शेअर्स वाटप करण्याची रेकॉर्ड डेट जाहीर केलेली नाही. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स कंपनीचे शेअर्स 7.61 टक्क्यांच्या वाढीसह 153.50 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 30 टक्के परतावा कमावून दिला आहे.

मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 50 टक्के वाढली आहे. तर मागील एका वर्षभरात अडवाणी हॉटेल्स अँड रिसॉर्ट्स कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 100 टक्के वाढवले आहेत. या कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 50.25 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bonus Shares on Advani Hotels Share Price 01 February 2024.

हॅशटॅग्स

Bonus shares(93)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x