
EPFO Online Services | कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (ईपीएफओ) मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म ट्विटरवर काही ऑनलाइन सेवा सुरू करत असल्याची घोषणा केली आहे. ग्राहकांना घरबसल्या या सेवांचा लाभ घेता यावा, यासाठी ही सेवा आणली जात आहे. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाचा पेन्शनधारकांना विशेष फायदा होणार आहे.
ऑनलाइन सेवांची लिस्ट :
१. पेन्शन दावे ऑनलाइन सादर करणे (ईपीएफओ सदस्य पोर्टल / उमंग अॅपद्वारे).
२. पेन्शन पासबुक ऑनलाइन पहा.
३. डिजी-लॉकरमधून पेन्शन पेमेंट ऑर्डर (पीपीओ) डाऊनलोड करा.
४. मोबाईल अ ॅपद्वारे घरबसल्या डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करणे.
उमंग अॅप आहे अत्यंत उपयुक्त
इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (एमईआयटीवाय) आणि नॅशनल ई-गव्हर्नन्स डिव्हिजन (एनईजीडी) यांनी भारतात मोबाइल गव्हर्नन्स चालविण्यासाठी उमंग अॅप विकसित केले आहे. उमंग सर्व भारतीय नागरिकांना केंद्रापासून स्थानिक स्वराज्य संस्था आणि इतर नागरिक-केंद्रित सेवांपर्यंत अखिल भारतीय ई-गव्हर्नन्स सेवांचा लाभ घेण्यासाठी एकच व्यासपीठ प्रदान करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.