
Escorts Kubota Share Price | एस्कॉर्ट्स कुबोटा या कृषी उपकरणे, मशिन्स आणि ट्रॅक्टर बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने मागील 10 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील दहा वर्षात एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या शेअरने लोकांना तब्बल 3,500 टक्के परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही दहा वर्षांपूर्वी एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या स्टॉकवर 10000 रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 3.5 लाख रुपये झाले असते.
शुक्रवार दिनांक 18 ऑगस्ट 2023 रोजी एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचे शेअर्स 2841.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज मंगळवार दिनांक 22 ऑगस्ट 2023 रोजी एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचे शेअर्स 3.41 टक्के वाढीसह 2,945.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
एस्कॉर्ट्स कुबोटा ही कंपनी मुख्यतः कृषी क्षेत्राशी संबंधित उपकरणे, मशीन्स, हाताळणी यंत्रे, ट्रॅक्टर बनवण्याचा व्यवसाय करते. एस्कॉर्ट्स कुबोटा या कंपनीचे नाव भारतीय कृषी क्षेत्रात नावाजलेले आहे. एस्कॉर्ट्स कुबोटा या कंपनीचे एकूण एकूण बाजार भांडवल 31400 कोटी रुपये आहे. शेअर बाजारातील दिवंगत गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पातळी रेखा झुनझुनवाला यांनी देखील एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीचे शेअर्स खरेदी केले आहेत. या कंपनीमध्ये फॉरेन पोर्टफोलिओ गुंतवणूकदारानी 5.19 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. आणि रेखा झुनझुनवाला यांनी कंपनीचे 1.62 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
नुकताच एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीने आपले जून 2023 तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले होते. या कंपनीने जून 2023 तिमाहीत निव्वळ नफ्यात तब्बल 93 टक्के वाढ साध्य केली आहे. या कंपनीने जून तिमाहीमध्ये 283 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
ब्रोकरेज फर्म एमके ग्लोबलने एस्कॉर्ट्स कुबोटा कंपनीच्या स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ज्ञांच्या मते या कंपनीच्या ट्रॅक्टरसाठी वितरणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ पाहायला मिळाली आहे. म्हणून ब्रोकरेज फर्मने एस्कॉर्ट्स कुबोटा स्टॉकवर 3,020 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. पुढील काळात हा स्टॉक 6 टक्के आणखी वाढेल असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.