
Fast Money Share | गेल्या आठवड्यात स्टॉक मार्केटमध्ये तेजीचे चक्र फिरताना दिसले. मात्र शेवटच्या दिवशी बाजारात पडझड पाहायला मिळाली होती. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये सकाळी 10:23 वाजेपर्यंत बीएसई निर्देशांकावर ट्रेड करणाऱ्या Skipper कंपनीच्या शेअरमध्ये 20 टक्के अपर सर्किट लागला होता, आणि स्टॉक 108.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. तर NSE इंडेक्सवर हा स्टॉक 108.65 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. हा स्टॉक सध्या सप्टेंबर 2018 नंतरच्या सर्वोच्च किंमत पातळीवर ट्रेड करत आहे.
स्टॉकमध्ये अचानक वाढीचे कारण :
स्किपर कंपनी मुख्यतः पॉवर प्रोड्युसर आणि ट्रान्समिशन मॅन्युफॅक्चरिंग उद्योगात काम करणारी जगातील आघाडीच्या उत्पादक कंपन्यापैकी एक मानली जाते. याशिवाय ही कंपनी दूरसंचार आणि रेल्वे संरचनांची प्रमुख उत्पादक आहे. स्कीपर कंपनी पॉलिमर्स, पाईप आणि फिटिंग उद्योगात ही गुंतलेली आहे. या कंपनीकडे 54,000 दशलक्ष आंतरराष्ट्रीय आणि 51,000 दशलक्ष देशांतर्गत बिडची मजबूत पाइपलाइन आहे. आणि 2022 या चालू आर्थिक वर्षात कंपनीला आंतरराष्ट्रीय बाजारातून मोठ्या प्रमाणात ऑर्डर मिळण्याची शक्यता आहे.
स्किपर कंपनीचे व्यापार उद्दिष्ट :
2022 या चालू वर्षात निर्यात होणाऱ्या अभियांत्रिकी वस्तूंच्या महसुलाच्या 50 टक्के आणि पुढील 2 वर्षांत 75 टक्के वाढ होण्याच्या अपेक्षा आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार 30 जून 2022 पर्यंत क्लोजिंग ऑर्डर बुकचे मूल्य 2,163 कोटी रुपये होते. ऑर्डर बुकमध्ये 45 टक्के निर्यात आणि 55 टक्के देशांतर्गत ऑर्डरचा समावेश होता. 12 नोव्हेंबर 2022 रोजी कंपनीने आपले सप्टेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले, आणि माहिती दिली की कंपनीने नवीन प्रकल्प सुरू केले आहेत.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.