 
						Federal Bank Share Price | मागील काही दिवसांपासून फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये जबरदस्त उलाढाल पाहायला मिळत आहे. देशांतर्गत ब्रोकरेज फर्म आनंद राठीने फेडरल बँकेचे शेअर खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. तज्ञांच्या मते, फेडरल बँकेचे शेअर्स अल्पावधीत 200 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. ( फेडरल बँक अंश )
मागील आठवड्यात शुक्रवारी या बँकेचे शेअर्स 1.22 टक्के वाढीसह 165.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. आज सोमवार दिनांक 6 मे 2024 रोजी फेडरल बँकेचे शेअर्स 1.72 टक्के घसरणीसह 163.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
ब्रोकरेज फर्मच्या मते, फेडरल बँकेच्या शेअर्समध्ये मजबूत वाढीचे संकेत मिळत आहेत. 2023-24 या आर्थिक वर्षाच्या जानेवारी-मार्च तिमाहीत फेडरल बँकेचा नफा 906 कोटी रुपये नोंदवला गेला होता. 2023-24 या संपूर्ण आर्थिक वर्षात फेडरल बँकेने 24 टक्के वाढीसह 3,721 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे.
फेडरल बँकेने 2022-23 मध्ये 3,011 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. जानेवारी ते मार्च या तिमाही कालावधीत फेडरल बँकेने 23.42 टक्के वाढीसह 6432 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. याच काळात फेडरल बँकेचे निव्वळ व्याज उत्पन्न 15 टक्क्याच्या वाढीसह 2,195 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवालाचा यांनी फेडरल बँकेचे 3,83,11,060 शेअर्स म्हणजेच 1.59 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. राकेश झुनझुनवाला यांनी देखील फेडरल बँकेचे 2,45,00,000 शेअर्स म्हणजेच 1.02 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. राकेश झुनझुनवाला यांच्या निधनानंतर त्यांचाही पोर्टफोलिओ रेखा झुनझुनवाला हाताळत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		