2 May 2025 9:38 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Stock To Buy | स्वस्तात असलेला हा शेअर 6 महिन्यांत 200 रुपयांवर जाणार, तेजीत कमाई करा भाऊ, स्टॉक नोट करा

Stock to Buy

Stock To Buy | सध्याच्या शेअर बाजारातील अस्थिर परिस्थितीचा फायदा घेण्यासाठी जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, आम्ही तुमच्यासाठी एक कामाची बातमी घेऊन आलो आहोत. आज या लेखात आम्ही तुम्हाला एका स्वस्त दरात खरेदीसाठी उपलब्ध असणाऱ्या स्टॉकबद्दल माहिती देणार आहोत. ब्रोकरेज फर्मच्या मते, या स्टॉकमध्ये पुढील काळात मजबूत वाढ होऊ शकते आणि, काही दिवसांतच हा स्टॉक लोकांना बंपर कमाई करून देऊ शकतो. आपण ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत त्याचे नाव आहे, “फेडरल बँक”. स्टॉक मार्केट तज्ज्ञ फेडरल बँकेच्या स्टॉकबाबत अतिशय उत्साही दिसून येत आहेत. तज्ञांनी हा स्टॉक बिनधास्त खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. फेडरल बँकेच्या शेअर्सने गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बीएसईवर 136.30 रुपये हा आपला 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे.

विक्रमी उच्चांकावर शेअर्सची किंमत :
सप्टेंबर तिमाहीतील अप्रतिम निकालानंतर, फेडरल बँकेच्या शेअरमध्ये कमालीची वाढ पाहायला मिळाली आहे. फेडरल बँकेच्या शेअर्सने आज इंट्राडे ट्रेड सेशनमध्ये बीएसई निर्देशांकावर 136.30 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे . आज या स्टॉकमध्ये 2.10 टक्के वाढ पाहायला मिळाली आहे. फेडरल बँकेच्या शेअर्सची किंमत या वर्षी आतापर्यंत YTD दराने 56 टक्के वधारली आहे. LKP सिक्युरिटीज फर्मने फेडरल बँकेचे शेअर्ससाठी 180 रुपयाची लक्ष किंमत जाहीर केली आहे. LKP सिक्युरिटीज फर्मने स्टॉकला ‘बाय’ रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IIFL सिक्युरिटीजने फेडरल बँकेचे स्टॉक ‘बाय’ रेटिंग देऊन खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. IIFL ने फेडरल बँकेच्या शेअरसाठी 180-200 रुपये लक्ष किंमत जाहीर केली आहे. फेडरल बँक ही लक्ष किंमत पुढील सहा महिन्यांत स्पर्श करेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

तिमाही निकाल :
फेडरल बँकेच्या निव्वळ नफ्यात 52.89 टक्क्यांची वाढ झाली आहे. सप्टेंबर 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत फेडरल बँकेचा निव्वळ नफा स्टँडअलोन आधारावर 52.89 टक्क्यांच्या वाढीसह 703.71 कोटी रुपये पर्यंत गेला आहे. फेडरल बँकने बुडित कर्जासाठी तरतूद कमी केल्यामुळे त्यांच्या नफ्यात वाढ दिसून आली आहे. मागील वर्षी याच तिमाहीत फेडरल बँकने 460.26 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला होता. जुलै-सप्टेंबर 2022 या तिमाहीत बँकेने स्टँडअलोन आधारावर 4,630.30 कोटी रुपये एकूण उत्पन्न कमावले आहे. मागील वर्षी या तिमाहीत कालावधीत फेडरल बँकेने 3,870.90 कोटी रुपये उत्पन्न कमावले होते. या बँकेचे NPA म्हणजेच बुडीत कर्जे सप्टेंबर 2022 च्या तिमाहीच्या अखेरीस 2.46 टक्क्यांवर आले आहे. सप्टेंबर 2021 मध्ये तो फेडरल बँकेचा NPA 3.24 टक्के होता. फेडरल बँकेचा सकल NPA मागील वर्षी 2021 मध्ये 4,445.84 कोटी रुपये होता, जो या वर्षी 4,031.06 कोटी रुपये पर्यंत आला आहे. बँकेचा निव्वळ NPA 1,262.35 कोटी रुपये आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Federal Bank Stock has been recommended to Buy by Stock market expert and brokerage firm on 04 November 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या