
Focus Lighting and Fixtures Share Price| सध्या जर तुम्ही शेअर बाजारात गुंतवणूक करून मजबूत कमाई करू इच्छित असाल तर तुम्ही ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीच्या शेअर्सवर लक्ष ठेवले पाहिजे. या कंपनीच्या शेअरने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 101.72 टक्के परतावा कमावून दिला आहे. आज शुक्रवार दिनांक 12 मे 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.99 टक्के घसरणीसह 521.15 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
स्टॉकची कामगिरी :
‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीच्या शेअर्सने मागील एका महिन्यात आपल्या गुंतवणूकदारांना 13.40 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. तथापि, या कंपनीच्या शेअरने आपल्या दीर्घकालीन गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. 2023 या वर्षात हा स्टॉक 73 टक्क्यांनी वाढला आहे. तर मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या गुंतवणूकदारांनी 101.72 टक्के परतावा कमावला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 527.89 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील तीन वर्षांत या कंपनीच्या स्टॉकने आपल्या गुंतवणुकदारांना 3050 टक्के बंपर नफा कमावून दिला आहे.
मे 2020 मध्ये ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीचे शेअर्स 17.40 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज हा स्टॉक 521.15 रुपयेवर पोहचला आहे. अवघ्या तीन वर्षांत या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 31 पट परतावा कमावून दिला आहे. जर तुम्ही 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते ते आज तुमच्या गुंतवणुकीचे मुख्य 31 लाख रुपये झाले असते.
कंपनीचे तिमाही निकाल :
मार्च 2023 च्या तिमाहीत ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीने 53 टक्के वाढीसह 5.38 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत कंपनीने 3.51 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीच्या विक्रीत 16.63 टक्क्यांची वाढ झाली आणि कंपनीने 40.89 कोटी रुपये विक्री नोंदवली आहे.
2022 च्या मार्च तिमाहीत कंपनीची विक्री 35.06 कोटी रुपये होती. संपूर्ण FY23 वर्षात ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीने 389.64 टक्के वाढीसह 23.16 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. FY22 मध्ये ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीने 4.73 कोटी रुपये नफा कमावला होता.
कंपनी बद्दल थोडक्यात :
‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर्स’ कंपनी मुख्यतः लाइट एमिटिंग डायोड म्हणजेच LED दिवे आणि फिक्स्चर बनवण्याच्या कामात गुंतलेली आहे. ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनीच्या विभागांमध्ये व्यापार आणि उत्पादन कार्य सामील आहेत. ‘फोकस लाइटिंग अँड फिक्स्चर’ कंपनी किरकोळ उद्योग, ऑफिस आणि होम लाइटिंग, हॉस्पिटॅलिटी लाइटिंग आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांना लाईटिंग सेवा प्रदान करण्याचे काम करते.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.