
Genesys International Share Price | ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीने मागील 3 वर्षांत आपल्या शेअर धारकांना 1100 टक्क्यांहून अधिक नफा कमावून दिला आहे. 18 मे 2020 रोजी ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 28.75 रुपये किमतीवर ट्रेड (Genesys International Share Price NSE) करत होते. 19 मे 2023 रोजी ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 356.50 रुपये किंमत पातळीवर ट्रेड करत होते. (Genesys International Share Price Today)
ज्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीमध्ये 1 लाख रुपये लावले आहेत, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 12.40 लाख रुपये झाले आहे. ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचा RSI 59.9 वर आहे. जो ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनच्या मधे येतो. जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 20 दिवस आणि 50 दिवसांच्या झोनमध्ये ट्रेड करत आहेत. (Genesys International Share Price BSE)
जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन शेअरचा परतावा – Genesys International Share Price History
जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 23.69 टक्के नकारात्मक परतावा कमावून दिला आहे. यावर्षी आतापर्यंत शेअरची किंमत 22.64 टक्क्यांनी कमजोर झाली आहे. तथापि गुंतवणूकदारांसाठी चांगली बातमी अशी आहे की, मागील एका महिन्यात ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 22.16 टक्के परतावा कमावून दिला आहे.
या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 664.70 रुपये होती. तर 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 283.45 रुपये प्रति शेअर होती. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 4.58 टक्के वाढीसह 365.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन शेअरची अंदाजित अपेक्षित प्राईस २०२५ – Genesys International Share Price Prediction 2025
तिमाही निकाल तपशील :
डिसेंबर 2022 तिमाहीत ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीने 7.86 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाहीत ‘जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड’ कंपनीने 8.24 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. डिसेंबर 2022 मध्ये जेनेसिस इंटरनॅशनल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीने 54.43 कोटी रुपयेची सेल्स केली होती.