5 May 2024 1:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Bank of Maharashtra | बँक ऑफ महाराष्ट्रचा 62 रुपयाचा शेअर पैसे छापखाना झाला, 1 महिन्यात 25.90 टक्के परतावा कमाई

Bank of Maharashtra

Bank of Maharashtra | सरकारी बँक ऑफ महाराष्ट्र ग्राहकांच्या विश्वासातील बँक म्हणून प्रसिद्ध आहे. बँकेचे ग्राहक विविध FD मध्ये पैसे गुंतवून कमाई करत असले तरी अल्पावधीत सार्वधिक कमाई करत आहेत ते बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्सचे ग्राहक असं म्हणावं लागेल.

कारण बँक FD वार्षिक व्याजापेक्षा अनेक पटीने परतावा 1 महिन्यात मिळतो आहे. परिणामी पैसे अल्पावधीत जलद गतीने वाढत आहे. बँकेची भक्कम आर्थिक स्थिती आणि बँकेच्या भविष्यातील योजना स्पष्ट असल्याने लोकांचा कल बँक ऑफ महाराष्ट्र शेअर्सकडे वळला आहे.

काल एनएसईवर बँक ऑफ महाराष्ट्रचा शेअर 3 टक्क्यांनी वाढून 61.75 रुपयांवर बंद झाला होता, तर आज 1.12% वाढून 62.95 रुपयांवर ट्रेड करत आहे. गेल्या वर्षभरात हा शेअर 132.29 टक्क्यांनी वधारला असून निफ्टीमध्ये 21.22 टक्के आणि निफ्टी पीएसयू बँक निर्देशांकात 83.52 टक्के वाढ झाली आहे.

बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये सलग तिसऱ्या सत्रात मोठी वाढ झाल्याने गुंतवणूकदारांना अल्पावधीत मोठा परतावा मिळतोय. मागील 1 महिन्यात शेअरने गुंतवणूकदारांना 25.90 टक्के परतावा दिला आहे. काल सुद्धा एनएसईवर भारतीय वेळेनुसार 12 वाजून 49 मिनिटांनी हा शेअर 3 टक्क्यांनी वधारून 61.75 रुपयांवर बंद झाला होता. बेंचमार्क निफ्टी दिवसभरात 0.11% वधारून 21863.25 वर बंद झाला. सेन्सेक्स 0.05 टक्क्यांनी वधारून 71855.64 वर आहे. गेल्या महिन्याभरात बँक ऑफ महाराष्ट्र 25.90 टक्क्यांनी वधारली आहे.

दरम्यान, बँक ऑफ महाराष्ट्र चा घटक असलेल्या निफ्टी पीएसयू बँकेचा निर्देशांक गेल्या महिन्याभरात सुमारे 19.73 टक्क्यांनी वधारला असून सध्या तो 2.45 टक्क्यांनी वाढून 6934.15 वर बंद झाला आहे. गेल्या महिन्याभरात दररोज सरासरी 808.06 लाख शेअर्सच्या तुलनेत आज या शेअरचे प्रमाण 474.48 लाख शेअर्सवर पोहोचले.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Bank of Maharashtra Share Price NSE Live 16 February 2024.

हॅशटॅग्स

#Bank of Maharashtra(52)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x