15 May 2024 5:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 15 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या BEML Share Price | सरकारी कंपनीचा स्टॉक रॉकेट तेजीत, 2 दिवसात 18% परतावा दिला, खरेदीला ऑनलाईन गर्दी LIC Share Price | PSU LIC स्टॉक तेजीत वाढणार, तज्ज्ञांकडून स्ट्राँग बाय रेटिंग, टार्गेट प्राईस जाहीर NMDC Share Price | NMDC सहित हे 5 शेअर्स मोठा परतावा देणार, मिळेल 35 टक्केपर्यंत परतावा L&T Share Price | L&T सहित हे 10 शेअर्स 40 टक्केपर्यंत परतावा देतील, अल्पावधीत कमाईची मोठी संधी Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Polycab Share Price | तज्ज्ञांकडून पॉलीकॅब इंडिया स्टॉकवर 'बाय' रेटिंग, 953% परतावा देणारा शेअर तेजीत वाढणार
x

Yes Bank Share Price | अल्पवधीत 41% परतावा देणारा येस बँक शेअर ब्लॉक डीलमुळे अजून घसरणार? नेमकं काय होणार?

Yes Bank Share Price

Yes Bank Share Price | गुरूवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 4 टक्के वाढीसह ट्रेड करत होते. मीडिया रिपोर्टनुसार येस बँकेचे 40 कोटी शेअर्स ब्लॉक डील अंतर्गत विकले गेले आहे. या शेअर्सचे एकूण मुल्य 1160 कोटी रुपये आहे.

प्रसिद्ध गुंतवणूक संस्था कार्लाइल ग्रुपचा भाग असलेल्या CA Basque Investments फर्मने ब्लॉक डीलद्वारे येस बँकेचे 40 कोटी शेअर्स खुल्या बाजारात विकले आहेत. हे प्रमाण बँकेच्या एकूण भाग भांडवलाच्या 1.39 टक्के आहे. आज शुक्रवार दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 1.03 टक्के घसरणीसह 28.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

कार्लाइल गृपने जुलै 2022 मध्ये येस बँकेचे 9.99 टक्के भाग भांडवल 13.78 रुपये किमतीवर खरेदी केले होते. या शेअर्सचे एकूण मूल्य 4450 कोटी रुपये होते. CA Basque Investments कंपनीकडे डिसेंबर 2023 अखेरीपर्यंत येस बँकेचे 1,84,80,77,851 शेअर्स म्हणजेच जवळपास 6.43 टक्के भाग भांडवल धारण केले होते. 15 फेब्रुवारी 2024 रोजी येस बँकेचे शेअर्स 29 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये येस बँकेचे शेअर्स 3.76 टक्क्यांच्या वाढीसह 29.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

मागील 3 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 32.81 रुपये होती. मागील 3 महिन्यांत येस बँकेच्या शेअर्सची किंमत 41 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या बँकेच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 74.46 टक्के परतावा कमावून दिला आहे. येस बँकेचे एकूण बाजार भांडवल 84000 कोटी रुपये आहे.

चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत येस बँकेने 231.6 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील वर्षीच्या याच तिमाहीत येस बँकेने 51.5 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. येस बँकेच्या निव्वळ नफ्यात वार्षिक आधारावर 349.7 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. येस बँकेची ढोबळ अनुत्पादक मालमत्ता म्हणजेच एनपीए प्रमाण 2.0 टक्के आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Yes Bank Share Price NSE Live 16 February 2024.

हॅशटॅग्स

#Yes Bank Share Price(137)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x