 
						Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना जबरदस्त परतावा कमावून दिला आहे. मागील 3 वर्षांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 7000 टक्के परतावा कमावून दिला आहे. या काळात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 18 रुपयेवरून वाढून 1300 रुपये किमतीवर पोहचले आहे.
मागील 3 वर्षांत या कंपनीने आपल्या पात्र गुंतवणुकदारांना दोन वेळा बोनस शेअर्स वाटप केले होते. ज्या लोकांनी 3 वर्षांपूर्वी या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 2 कोटी रुपये झाले आहे. आज बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी 2024 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग स्टॉक 0.11 टक्के घसरणीसह 1,329.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
20 फेब्रुवारी 2024 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 1331.10 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 12 फेब्रुवारी 2021 रोजी जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे शेअर्स 18.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जर तुम्ही 2021 साली या कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते, तर तुम्हाला 5333 शेअर्स मिळाले असते. ऑक्टोबर 2021 मध्ये जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीने आपल्या शेअरधारकांना 1:3 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते.
त्यानंतर ऑक्टोबर 2023 मध्ये देखील या कंपनीने गुंतवणुकदारांना 2: 1 या प्रमाणात बोनस शेअर्स वाटप केले होते. बोनस शेअर्स जोडल्यानंतर तुमच्या सर्व शेअर्सची संख्या 21330 झाली असती. सध्याच्या किमतीनुसार तुमच्या सर्व शेअर्सचे एकूण मुल्य 2.83 कोटी रुपये झाले असते.
मागील एका वर्षात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 321 टक्के परतावा कमावून दिला आहे. याकाळात कंपनीचे शेअर्स 316.88 रुपयेवरून वाढून 1331.10 रुपये किमतीवर पोहचले आहेत. मागील 6 महिन्यांत, जेनसोल कंपनीच्या गुंतवणूकदारांचे पैसे 128 टक्के वाढले आहे.
मागील एका महिन्यात जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 50 टक्के परतावा कमावून दिला आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 1377.10 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 265.42 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		