30 April 2025 6:09 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 01 मे 2025, तुमच्यासाठी गुरुवारचा दिवस कसा असेल? तुमचे गुरुवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार गुरुवार 01 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Reliance Share Price | जेएम फायनान्शियल फर्म बुलिश, रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्स टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RELIANCE AWL Share Price | जबरदस्त तेजीचे संकेत; 58 टक्के अपसाईड तेजीचे संकेत, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: AWL IRFC Share Price | पीएसयू शेअर्सबाबत महत्वाचे संकेत, मोठी झेप घेणार, टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC Jio Finance Share Price | हा शेअर लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा, संयम देईल मोठा परतावा - NSE: JIOFIN Tata Technologies Share Price | टाटा ग्रुप शेअर्सबाबत महत्वाची अपडेट, फायदा देणारी अपडेट आली - NSE: TATATECH
x

Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग शेअरने गुंतवणूकदारांचे नशीब बदलले, अल्पावधीत दिला 2,000 टक्के पेक्षा जास्त परतावा

Gensol Engineering Share Price

Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात सूचीबद्ध झाल्यापासून आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर नफा कमावून दिला आहे. या कंपनीचे शेअर्स 3 जुलै 2023 रोजी NSE एक्सचेंजच्या मेनबोर्डवर स्थलांतरित करण्यात आले आहेत. स्टॉक एक्स्चेंज इक्विटीकडे सूची करारासह सूचीकरण अर्ज सादर केल्यानंतर जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअर स्थलांतराला अंतिम मंजुरी देण्यात आली होती. (Gensol Share Price)

सेबीने दिलेल्या माहितीनुसार 03 जुलै 2023 पासून जेनसोल इंजिनिअरिंग कंपनीचे इक्विटी शेअर्स BSE SME प्लॅटफॉर्म अंतर्गत सूचीबद्ध करण्यात आले होते, ते आता स्थलांतरित करून ‘B’ गटात सामील केले जातील. आज मंगळवार दिनांक 4 जुलै 2023 रोजी जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स 2.69 टक्के वाढीसह 1393 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीचे शेअर्स आता मेनबोर्ड प्लॅटफॉर्मवरील व्यवहारामध्ये सामील केले जाणार आहे. अशी माहिती सेबीने जाहीर केली. यासह सेबीने स्पष्ट केले आहे की, जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या सिक्युरिटर्टीजची खरेदी-विक्री डीमटेरियलाइज्ड स्वरूपात केली जाईल, आणि या स्टॉकमधील ट्रेडिंग युनिट मार्केट लॉटमध्ये होईल.

जेनसोल इंजिनीअरिंग या कंपनीचा IPO 2019 मध्ये शेअर बाजारात लाँच करण्यात आला होता. या कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी देखील मजबूत प्रतिसाद दिला होता. स्टॉक लिस्टिंगनंतर जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने लोकांना मालामाल केले आहे.

जेनसोल इंजिनीअरिंग कंपनीच्या शेअरने शेअर बाजारात लिस्टिंग झाल्यानंतरच्या गुंतवणुकदारांना 2,000 टक्के पेक्षा जास्त नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. एका वर्षात शेअरची किंमत 150 टक्के वाढली आहे.

जेन्सॉल इंजिनीअरिंग ही कंपनी अभियांत्रिकी संबधित सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. कंपनी आपल्या ग्राहकांना सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी मदत करते. या कंपनीचा भारतात 590 MWp पेक्षा जास्त क्षमतेचा EPC पोर्टफोलिओ कार्यरत आहे. कंपनी भारतात तसेच आणि जगभरात विविध देशांना आपल्या सेवा प्रदान करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Gensol Engineering Share Price today on 04 July 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Gensol Engineering Share Price(16)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या