
Gensol Engineering Share Price | जेनसोल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जबरदस्त तेजीसह ट्रेड करत होते. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर 5 टक्के वाढीसह 1,761.75 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये इतकी मोठी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, कंपनीला नुकताच 101 कोटी रुपये मूल्याची निर्यात ऑर्डर मिळाली आहे.
या ऑर्डर अंतर्गत जेनसोल इंजीनियरिंग कंपनीला दुबईच्या सरकारी वर्कशॉप वेअरहाऊस आणि दुबई पोलिसांसाठी मेगा सोलर इंजीनियरिंग प्रोजेक्ट निर्यात करण्याचे काम मिळाले आहे. आज बुधवार दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी जेनसोल इंजीनियरिंग कंपनीचे शेअर्स 1.76 टक्के घसरणीसह 1,730.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
जेनसोल इंजीनियरिंग या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअरने अल्पावधीत आपल्या गुंतवणुकदारांना मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. मागील काही वर्षापासून या स्मॉल कॅप कंपनीचे शेअर्स मजबूत कामगिरी करत आहेत. या कंपनीच्या स्टॉकने YTD आधारे आपल्या शेअर धारकांना 70 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 900 रुपयेवरून वाढून 1,747 रुपये किमतीवर पोहचली आहे. याकाळात गुंतवणूकदारांनी तब्बल 95 टक्के नफा कमावला आहे.
मागील दोन वर्षांत जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरची किंमत 50 रुपयेवरून वाढून 1,747 रुपयेवर पोहचली होती. या काळात ज्या लोकांनी जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 35 लाख रुपये झाले असते.
या कंपनीचे शेअर्स NSE आणि BSE या दोन्ही इंडेक्सवर ट्रेड करत असून कंपनीचे एकूण बाजार भांडवल 2,152 कोटी रुपये आहे. जेनसोल इंजीनियरिंग कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक पातळी किंमत 1,990 रुपये होती. तर नीचांक पातळी किंमत 797.05 रुपये होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.