 
						Gland Pharma Share Price | ‘ग्लँड फार्मा’ कंपनीच्या शेअरमध्ये कमालीची उलाढाल पाहायला मिळत आहे. सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरमधे 19 टक्क्यांची घसरण पहायला मिळाली होती. मात्र आज मंगळवार दिनांक 23 मे 2023 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 6.92 टक्के वाढीसह 955.40 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
पाच ट्रेडिंग सेशनमध्ये शेअर 29.76% कमजोर
सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स आपल्या 52 आठवड्यांच्या निश्चित किंमत पातळीवर आले होते. मागील पाच ट्रेडिंग सेशनमध्ये ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 29.76 टक्के कमजोर झाले आहेत. ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरमध्ये ही घसरण निराशाजनक तिमाही निकालानंतर पाहायला मिळाली आहे.
शेअर उच्चांकी पातळीच्या 80 टक्के खाली
ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3176.75 रुपये होती. या कंपनीचे शेअर्स आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीच्या 80 टक्के खाली आहे. ग्लँड फार्मा कंपनीच्या शेअरची सर्वकालीन उच्चांक किंमत पातळी 4,350 रुपये होती. मात्र शेअरची किंमत 80 टक्क्यांनी घसरुन 955.40 रुपये वर आली आहे.
IPO इश्यू किमतीपेक्षा ही 42% खाली
12 ऑगस्ट 2021 रोजी ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 4350 रुपये या आपल्या सार्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. आता या कंपनीचे शेअर्स 1,500 रुपये या आपल्या IPO इश्यू किमतीपेक्षा ही 42 टक्के खाली ट्रेड करत आहेत. ग्लँड फार्मा कंपनीचे शेअर्स 20 नोव्हेंबर 2020 रोजी शेअर बाजारात सूचीबद्ध झाले होते.
कंपनीची आर्थिक कामगिरी :
आर्थिक वर्ष 2022-2023 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत ग्लँड फार्मा कंपनीच्या PAT मध्ये म्हणजेच कर कपातीनंतरच्या नफ्यात 72 टक्के घसरण झाली आहे. मार्च तिमाहीत कंपनीने फक्त 78.70 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील वर्षी याच तिमाही कालावधीत ग्लँड फार्मा कंपनीने 285.90 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता.
या फार्मा कंपनीचा महसूल देखील वार्षिक आधारावर 29 टक्के कमी झाला असून 785 कोटी रुपये नोंदवला गेला आहे. भारतीय तसेच परकीय बाजारपेठेतील प्रमुख उत्पादनांचा सेल्स कमी झाल्याने कंपनीच्या महसुलात तूट निर्माण झाली आहे. ग्लँड फार्मा कंपनीचे एकूण बाजार भांडवल 14537 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		