4 May 2024 2:45 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 04 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या REC Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, एका वर्षात 1 लाखाचे झाले 4 लाख, खरेदी करा स्टॉक Exide Share Price | शेअर नव्हे, पैसा छापण्याची मशीन! 1 महिन्यात दिला 50 टक्के परतावा, पुढची टार्गेट प्राईस जाहीर Hot Stocks | सुसाट तेजीने वाढणारे 4 स्वस्त शेअर्स खरेदी करा, रोज 20 टक्के अप्पर सर्किट हीट Piccadily Agro Share Price | दारू कंपनीचा शेअर रोज अप्पर सर्किट हीट करतोय, हा शेअर श्रीमंत करू शकतो Gold Rate Today | गुड-न्यूज! आज सोन्याचा भाव जोरदार धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Adani Wilmar Share Price | कमाई करून घ्या! मल्टिबॅगर अदानी विल्मर शेअर्समध्ये तेजीचे संकेत, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

Global Surfaces Share Price | 133 रुपयाच्या या शेअर लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी प्रति शेअर 23 रुपये परतावा, आता खरेदी करावा?

Global Surfaces Share Price

Global Surfaces Share Price | ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या IPO शेअर्सनी स्टॉक मार्केटमध्ये धमाकेदार एन्ट्री केली आहे. या कंपनीचे शेअर्स BSE इंडेक्सवर 163 रुपये किमतीवर सूचीबद्ध झाले आहेत. ज्या लोकांनी या कंपनीच्या IPO मध्ये पैसे लावले होते, त्यांना प्रत्येक शेअरवर 23 रुपये नफा मिळाला आहे. ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअरची IPO प्राइस बँड 133 रुपये ते 140 रुपये प्रति शेअर जाहीर करण्यात आली होती. (Global Surfaces Limited)

स्टॉक लिस्टिंगनंतर ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्सनी मजबूत वाढ नोंदवली आहे. स्टॉक लिस्टिंग झाल्यानंतर या कंपनीचे शेअर्स मजबूत तेजीत ट्रेड करत होते. लिस्टिंगच्या दिवशी ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स बीएसई इंडेक्सवर 165.10 रुपयेवर ट्रेड करत होते. आज शुक्रवार दिनाक 24 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 5.00 टक्के घसरणीसह 162.50 रुपये किमतीवर क्लोज झाले आहे. प्रॉफिट बुकींगमुळे आज स्टॉकमध्ये मोठ्या प्रमाणात पडझड पाहायला मिळाली आहे.

‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स सूचीबद्ध झाल्यावर ते 171.15 रुपये किंमतीपर्यंत वाढले होते. म्हणजेच हा स्टॉक एकूण 16.43 टक्के प्रीमियम किमतीवर लिस्ट झाला. ‘ग्लोबल सरफेसेस लिमिटेड’ कंपनीच्या IPO गुंतवणूकदारांनी मजबूत प्रतिसाद दिला होता. या कंपनीच्या IPO ला ओपनिंगच्या पहिल्या दिवशी 0.43 पट, दुसऱ्या दिवशी 1.10 पट आणि तिसऱ्या दिवशी 12.21 पट सबस्क्रिप्शन मिळाले होते. ग्लोबल सरफेसेस कंपनीचा IPO एकूण 14 पट सबस्क्राइब झाला होता.

IPO तपशील थोडक्यात :
1) ग्लोबल सरफेसेस लिमिटेड कंपनीच्या IPO उघडण्याची तारीख 13 मार्च 2023 होती.
2) ग्लोबल सरफेसेस लिमिटेड IPO बंद होण्याची तारीख 15 मार्च 2023 होती.
3) ग्लोबल सरफेसेस लिमिटेड कंपनीचे IPO शेअर्स वाटप करण्याचा दिवसा 20 मार्च 2023 होता.
4) ग्लोबल सरफेसेंस लिमिटेड IPO स्टॉकचे दर्शनी मूल्य 10 रुपये प्रति शेअर आहे.
5) या कंपनीने आपल्या IPO मध्ये लॉट साइज 100 शेअर्स प्रति लॉट निश्चित केली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Global Surfaces Share Price GMP on 24 March 2023.

हॅशटॅग्स

Global Surfaces Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x