11 December 2024 4:14 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024 Monthly Pension Scheme | भारी सरकारी योजना; केवळ एकदाच पैसे गुंतवा, प्रत्येक महिन्याला मिळेल 12,388 रुपये पेन्शन Investment Formula | गुंतवणुकीचा 15-15-15 चा फॉर्म्युला आहे चमत्कारी, करोडपती व्यक्ती असाच पैसा वाढवतात - Marathi News IRFC Share Price | मल्टिबॅगर IRFC शेअर बुलेट ट्रेनच्या स्पीडने परतावा देणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग - NSE: IRFC Vedanta Share Price | वेदांता शेअरने विक्रमी उच्चांक गाठला, पुढे रॉकेट तेजी, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, ब्रोकरेज बुलिश, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: TATAPOWER Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट नोट करा - NSE: RELIANCE
x

KPI Green Energy Share Price | मल्टिबॅगर शेअर स्वस्तात खरेदीची संधी, यापूर्वी 5 पटीने वाढवला पैसा

KPI Green Energy Share Price

KPI Green Energy Share Price | केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे, नुकताच या कंपनीने आपले शेअर्स स्प्लिट करण्याची घोषणा केली होती. त्याप्रमाणे आज या कंपनीचे शेअर्स एक्स स्टॉक स्प्लिट म्हणून ट्रेड करत आहेत. ( केपीआय ग्रीन एनर्जी कंपनी )

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीने आपले शेअर्स 1:2 या प्रमाणात विभाजित करण्याची घोषणा केली होती. यासाठी कंपनीने 18 जुलै हा दिवस रेकॉर्ड तारीख म्हणून निश्चित केला होता. मंगळवारी या कंपनीचे शेअर्स 5 टक्के वाढीसह 2039.85 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जी स्टॉक 5.00 टक्के वाढीसह 1,070.30 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 262 टक्के परतावा कमावून दिला आहे. चालू कॅलेंडर वर्षात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 115 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 2,109.25 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 496.92 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 12,290.12 कोटी रुपये होती.

केपीआय ग्रीन एनर्जी कंपनीचे शेअर्स स्टॉक स्प्लिट अंतर्गत 2 भागात विभागले जाणार आहे. शेअर बाजारात सूचीबद्ध असलेल्या कंपन्या किरकोळ गुंतवणूकदारांना शेअर्स परवडणाऱ्या किमतीत खरेदी करता यावे आणि शेअरची तरलता वाढावी यासाठी स्टॉक स्प्लिट करत असतात. KPI ग्रीन एनर्जी ही कंपनी पूर्वी KPI ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर या नावाने ओळखली जात होती.

2008 साली स्थापन झालेली केपीआय ग्रीन एनर्जी ही कंपनी KP ग्रुपची सोलर आणि हायब्रिड व्हर्टिकल शाखा म्हणून व्यवसाय करते. ही कंपनी गुजरातमधील एक आघाडीची सौर आणि संकरित ऊर्जा निर्मिती करणारी कंपनी आहे. तसेच ही कंपनी विविध व्यावसायिक क्षेत्रांद्वारे सौर आणि संकरित ऊर्जा वितरण सेवा प्रदान करण्याचा व्यवसाय करते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | KPI Green Energy Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

KPI Green Energy Share Price(19)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x