14 December 2024 5:34 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

IREDA Share Price | PSU शेअरने भरपूर कमाई झाली, आता सावध होण्याचा सल्ला, किती घसरणार स्टॉक प्राईस?

IREDA Share Price

IREDA Share Price | आयआरईडीए या सरकारी कंपनीच्या शेअरने आज लोअर सर्किट हीट केला आहे. 2024 या वर्षात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे अक्षरशः दुप्पट वाढवले आहे. ब्रोकरेज फर्म फिलिप कॅपिटलच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकसाठी जे काही सकारात्मक संकेत होते, त्यांचा परिणाम स्टॉक किंमतीवर पूर्वीच दिसून आला आहे. ( आयआरईडीए कंपनी अंश )

त्यामुळे आता हा स्टॉक किंचित करेक्शन मोडमध्ये जाऊ शकतो. परिमाण स्वरूप शेअरमध्ये जबरदस्त नफा वसुली पाहायला मिळू शकते. आज गुरूवार दिनांक 18 जुलै 2024 रोजी आयआरईडीए स्टॉक 4.63 टक्के घसरणीसह 259.47 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

ब्रोकरेज फर्मच्या मते, आयआरईडीए स्टॉक 130 रुपये किमतीवर येऊ शकतो. मंगळवारी हा स्टॉक 288.70 रुपये किमतीवर ओपन झाला होता. त्यानंतर शेअरची किंमत जबरदस्त घसरणीसह 275 रुपये किमतीवर आली होती. फिलिप कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉक सध्याच्या किमतीच्या तुलनेत 55 टक्क्यांनी घसरू शकतो. याच ब्रोकरेज हाऊसने यापूर्वी आयआरईडीए स्टॉकसाठी 110 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली होती. तज्ञांच्या मते, आयआरईडीए स्टॉकचा RSI 83.6 अंकावर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट झोनमध्ये पोहचला आहे.

सोमवारी आयआरईडीए कंपनीच्या शेअरने 310 रुपये किंमत स्पर्श केली होती. 2024 या वर्षात आयआरईडीए स्टॉक तब्बल 182 टक्क्यांनी मजबूत झाला आहे. मागील 3 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 83 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात आयआरईडीए कंपनीच्या शेअर्सची किंमत 62 टक्के वाढली आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 18 टक्के नफा कमावून दिला आहे. या कंपनीचा IPO स्टॉक डिसेंबर 2023 मध्ये शेअर बाजारात सूचीबद्ध झाला होता. कंपनीने आपल्या IPO स्टॉकची इश्यू किंमत 32 रुपये निश्चित केली होती. म्हणजेच हा स्टॉक आत्तापर्यंत इश्यू किमतीच्या तुलनेत 10 पट वाढला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | IREDA Share Price NSE Live 18 July 2024.

हॅशटॅग्स

IREDA Share Price(126)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x