11 May 2024 7:47 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 12 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा रविवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 12 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Power Share Price | तज्ज्ञांनी टाटा पॉवर शेअर्सची रेटिंग घटवली, स्टॉक प्राईसवर मोठा परिणाम होणार Servotech Share Price | मल्टिबॅगर सर्व्होटेक पॉवर सिस्टम्स शेअर्समध्ये घसरण वाढतेय, स्टॉक Hold करावा की Sell? Penny Stocks | चिल्लर प्राईस 10 पेनी शेअर्स खरेदी करा, किंमत 1 रुपया ते 7 रुपये, मोठी कमाई होईल GMP IPO | पहिल्याच दिवशी मालामाल करणारा IPO लाँच होतोय, ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ, खरेदी करणार? Tata Motors Share Price | टाटा मोटर्स कंपनीबाबत मोठी अपडेट आली, शेअर्सला किती फायदा होणार?
x

संतापजनक: कर्जमाफीमुळे शेतकरी सुस्तावतात; भाजप हरियाणाचे मुख्यमंत्री

BJP, Narendra Modi, Loksabha Election 2019

हरियाणा : एखाद्याला मोफत देण्याची सवय लावली, की मग ती व्यक्ती आळशी होते, अशा शब्दांत त्यांनी कर्ममाफीवर भाष्य केलं. ‘हरियाणातल्या शेतकरी समुदायाला त्यांच्या पुढील आर्थिक संकटं संपवायची आहे. एकदा लोकांना फुकटात काही मिळायची सवय लागल्यावर ते सुस्तावतात. ते इथून तिथून कर्ज घेऊ लागतात. ते आर्थिक नियोजन करत नाहीत. या प्रकारची योजना अनेक राज्यांमध्ये यशस्वी होऊ शकते. कारण तिथली परिस्थिती तशी आहे. परंतु हरियाणात ही योजना यशस्वी होऊ शकत नाही,’ असं खट्टर म्हणाले.

दरम्यान, ‘हरियाणात कर्जमाफी योजना नसल्याचा कोणताही नकारात्मक परिणाम लोकसभा निवडणुकीत दिसणार नाही. शेतकरी परिपक्व झाला आहे. कर्जमाफी देण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पिकाला चांगला भाव देण्याचे प्रयत्न आमच्याकडून सुरू आहेत. पिकाला उत्तम हमीभाव दिला जात आहे. आम्ही शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा केली. मात्र कोणत्याही प्रकारची सूट दिलेली नाही. शेती व्यवसाय अधिकाधिक लाभदायक करण्याच्या दृष्टीनं आमचे प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांनी अशा प्रकारचा फायदा याआधी कधीही पाहिलेला नव्हता,’ असा दावा खट्टर यांनी केला.

हॅशटॅग्स

#Narendra Modi(1665)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x