
Globe Commercials Share Price | ‘ग्लोब कमर्शियल लिमिटेड’ कंपनीच्या पेनी स्टॉकने मागील 6 महिन्यांत आपल्या गुंतवणुकदारांना मालामाल केले आहे. या कंपनीच्या शेअर ने मागील सहा महिन्यात आपल्या गुंतवणुकदारांना 573.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या लोकांनी सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 6 लाखांवर गेले आहे. (Globe Commercials Limited)
‘ग्लोब कमर्शियल लिमिटेड’ ही कंपनी अग्रीकल्चर कमोडिटीज आणि ई कॉमर्स सोल्युशन्स सेवा प्रदान करण्याच्या व्यवसायात गुंतलेली आहे. मागील 6 महिन्यांच्या काळात ‘ग्लोब कमर्शियल’ कंपनीचे शेअर्स 5 रुपयांवरून वाढून 39 रुपयांपर्यंत पोहचले होते. या कंपनीने मागील 6 महिन्यांच्या कालावधीत आपल्या शेअर धारकांना 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्सचे वाटप केले होते. जर तुम्ही सहा महिन्यापूर्वी या कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर तुम्हाला 20,000 शेअर्स मिळाले असते. जानेवारी 2023 मध्ये कंपनीने 1 : 1 या प्रमाणात मोफत बोनस शेअर्स वाटप केले होते. हे बोनस शेअर्स जोडल्यानंतर तुमच्या शेअर्सची संख्या 40,000 झाली असती. आज गुरूवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी ‘ग्लोब कमर्शियल’ कंपनीचे शेअर 0.026 टक्के घसरणीसह 39.00 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
सहा महिन्यांपूर्वी 1 लाख रुपयेमध्ये खरेदी केलेल्या शेअर्सचे मूल्य सध्या 15.60 लाख रुपये झाले असते. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने गुंतवणुकदारांना 407.81 टक्के परतावा कमावून दिला आहे. ‘ग्लोब कमर्शियल्स’ कंपनीच्या शेअर्समध्ये YTD आधारे 41.82 टक्के वाढ झाली होती. 13 एप्रिल 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 7.68 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 12 एप्रिल 2023 रोजी ‘ग्लोब कमर्शियल’ कंपनीचे 39.01 रुपये किमतीवर बंद झाले होते. ‘ग्लोब कमर्शियल’ कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 52.60 रुपये होती. त्याच वेळी या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 4.54 रुपये होती. ‘ग्लोब कमर्शियल लिमिटेड’ कंपनीचे एकूण बाजार भांडवल 23.5 कोटी रुपये आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.