
GMR Infra Share Price | जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर या विमानतळ सेवा संबंधित व्यवसाय करणाऱ्या कंपनीच्या शेअरमध्ये मजबूत उलाढाल पाहायला मिळत आहे. शेअर बाजारातील तज्ञांनी या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.
तज्ञांनी या स्टॉकवर 80.55 रुपये किंवा त्याच्या खालील किमतीवर गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे. हा स्टॉक पुढील काही दिवसात 86 रुपये किंमत स्पर्श करू शकतो, असे मत तज्ञांनी व्यक्त केले आहे.
मात्र गुंतवणूक करताना तज्ञांनी स्टॉकवर 76 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावण्याचा सल्ला दिला आहे. आज सोमवार दिनांक 1 जानेवारी 2024 रोजी जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 0.24 टक्के घसरणीसह 80.35 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.
GMR इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचा स्टॉक तांत्रिक चार्ट पॅटर्नमध्ये मूव्हिंग एव्हरेजमध्ये मजबूत तेजीचे संकेत देत आहे. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक 80.55 रुपये किमतीच्या आसपास खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 6 टक्के वाढीसह 81.50 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 81.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 36 रुपये होती.
जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे एकूण 59.07 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे एकूण 40.93 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. जीएमआर एअरपोर्ट्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या प्रवर्तक गटात 12 सदस्य आहेत. तर या गटाचे प्रमुख मल्लिकार्जुन राव गांधी हे आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.