12 December 2024 6:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Infosys Share Price | इन्फोसिस शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, चार्टवर तेजीचे संकेत - NSE: INFY Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर मालामाल करणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट नोट करा - NSE: JIOFIN TTML Share Price | टाटा ग्रुपचा TTML शेअर पुन्हा तेजीत, स्टॉक खरेदीला गर्दी, 1 महिन्यात दिला 23% परतावा - NSE: TTML NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO
x

Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील आजचे घसरलेले सोन्याचे दर तपासून घ्या

Gold Price Today

Gold Price Today | गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या विक्रमी किमती गाठल्यानंतर आज त्यात घसरण पाहायला मिळत आहे. बुधवारी सराफा बाजारात आणि मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्याने तेजीचा नवा विक्रम केला होता. पण आज गुरुवारी एमसीएक्समध्ये पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. तत्पूर्वी, म्हणजे बुधवारी सोने 61,000 रुपये (प्रति 10 ग्राम) आणि चांदी 75,000 रुपयांवर पोहोचली होती. याआधी फेब्रुवारीमहिन्यात सोन्याने तेजीच्या बाबतीत मागील विक्रम मोडला होता. मात्र, नंतर सोन्याच्या दरात सातत्याने तेजी दिसून येत होती.

आज सोन्या-चांदीचे दर किती घसरले
दिवाळी पर्यंत सोन्या-चांदीचे दर तेजीचा नवा विक्रम रचतील, असा तज्ज्ञांचा दावा आहे. त्यांच्या मते, सोने 65,000 रुपयांपर्यंत आणि चांदी 80,000 रुपयांपर्यंत जाऊ शकते. मात्र आज गुरुवारी मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (एमसीएक्स) सोन्या-चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळत आहे. सकाळी 10.40 वाजता सोन्याचा भाव 240 रुपयांनी घसरून 60616 रुपये प्रति 10 ग्राम आणि चांदी 108 रुपयांनी घसरून 74447 रुपये प्रति किलोग्राम पर ट्रेड करत आहे.

बुधवारी सराफा बाजारात काय स्थिती होती
याआधी बुधवारी एमसीएक्सवर सोने 60856 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदी 74555 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाली होती. बुधवारी सकाळी सराफा बाजारही जोरदार तेजीसह उघडला आणि सायंकाळी हिरवा कंदील दाखवून बंद झाला. व्यवहाराच्या अखेरीस 24 कॅरेट सोन्याचा भाव 60781 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा भाव 73834 रुपये प्रति किलोवर पोहोचला. त्याचप्रमाणे प्रमुख शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव 69,760 रुपये आणि 24 कॅरेट सोन्याचा भाव 69,760 रुपये सुरु होता. सराफा बाजाराचे नवे दर दुपारी १२ वाजता जाहीर होतात.

असे तपासा नवे दर
तुम्ही तुमच्या घरी बसूनही सोन्याची किंमत तपासू शकता. इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, तुम्ही 8955664433 नंबरवर मिस्ड कॉल देऊनच किंमत तपासू शकता. तुम्ही ज्या नंबरवरून मेसेज कराल त्याच नंबरवर तुमचे मेसेज येतील.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Gold Price Today updates check details on 06 April 2023.

हॅशटॅग्स

#Gold Price Today(249)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x