 
						Godawari Power Share Price | गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड या कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 129 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्यां लोकांनी एक वर्षापूर्वी या स्टॉकवर पैसे लावले होते, त्यांच्या गुंतवणूकीचे मूल्य दुप्पट झाले आहे.
शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये गोदावरी पॉवर अँड इस्पात कंपनीचे शेअर्स 1 टक्क्यांच्या वाढीसह 624.70 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 620 रुपये किंमत पातळीवर ओपन झाले होते, त्यानंतर हा स्टॉक इंट्रा-डे ट्रेडमध्ये 627 रुपये किमतीवर पोहचला होता. शुक्रवार दिनांक 13 ऑक्टोबर 2023 रोजी गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉक 0.40 टक्के वाढीसह 621.95 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
ब्रोकरेज हाऊस इक्विरस सिक्युरिटीज फर्मने आपल्या अहवालात गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉकबाबत सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. तज्ञांच्या मते या कंपनीचे शेअर्स पुढील काळात 1000 रुपये किंमत स्पर्श करू शकतात. इक्विरस सिक्युरिटीजच्या मते हा स्टॉक पुढील काळात सध्याच्या शेअरच्या किमतीपेक्षा 62 टक्के वाढू शकतो.
ब्रोकरेज हाऊसने गोदावरी पॉवर अँड इस्पात स्टॉकवर 1000 रुपये लक्ष्य किंमत जाहीर केली आहे. YTD आधारे या गोदावरी पॉवर आणि इस्पात लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 56.92 टक्के परतावा कमावून दिला आहे.
मागील 10 महिन्यांतील 8 महिने या कंपनीचे शेअर्स मजबूत वाढीसह ट्रेड करत होते. मार्च 2023 ते सप्टेंबर 2023 पर्यंत गोदावरी पॉवर अँड इस्पात लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 85 टक्के नफा कमावून दिला आहे. 4 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीच्या मल्टीबॅगर स्टॉकने 640.10 रुपये इंट्रा-डे उच्चांक किंमत स्पर्श केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		