
BHEL Share Price | बीएचईएल कंपनीचे शेअर्स मजबूत विक्रीच्या दबावात क्लोज झाले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्के घसरली होती. तर मागील तीन (NSE: BHEL) महिन्यांत हा स्टॉक 4.18 टक्के घसरला होता. मागील एक आणि दोन आठवड्यांत या कंपनीचे शेअर्स अनुक्रमे 2.21 टक्के आणि 6.73 टक्के वाढले होते. (बीएचईएल कंपनी अंश)
मागील 2 वर्षांत 387% परतावा दिला
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 127 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील दोन वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 387 टक्के वाढली आहे. बीएचईएल स्टॉकचा एक वर्षाचा बीटा 1.8 अंकावर आहे, जो उच्च अस्थिरता दर्शवतो.
मागील 3 वर्षांत 402% परतावा दिला
मागील तीन वर्षांत बीएचईएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 402 टक्के नफा कमवून दिला आहे. बुधवारी डीएचईएल कंपनीचे शेअर 2.97 टक्के वाढीसह 282.30 रुपये किमतीवर पोहोचले होते. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 98,298 कोटी रुपये आहे. या स्टॉकचा आरएसआय 52.6 वर आहे. म्हणजेच हा स्टॉक ओव्हरबॉट किंवा ओव्हरसोल्ड झोनमध्ये ट्रेड करत नाही. बीएचईएल कंपनीचे शेअर्स 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 200 दिवसांच्या SMA पातळीच्या वर परंतु 50 दिवस आणि 100 दिवसांच्या SMA पातळीच्या खाली ट्रेड करत आहेत.
ICICI सिक्युरिटीज फर्म – BUY रेटिंग
आज गुरुवार दिनांक 26 सप्टेंबर 2024 रोजी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.50 टक्के घसरणीसह 280.75 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. बीएचईएल स्टॉक 26 ऑक्टोबर 2023 रोजी 113.50 रुपये या 52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीवरून 145 टक्के वाढला आहे. मंगळवारी या कंपनीचे 22.17 कोटी रुपये मूल्याचे शेअर्स ट्रेड झाले होते. ICICI सिक्युरिटीज फर्मने बीएचईएल स्टॉकवर 370 रुपये टार्गेट प्राइस जाहीर केली आहे.
जेएम फायनान्शिअल फर्म – BUY रेटिंग
जेएम फायनान्शिअल फर्मने बीएचईएल स्टॉकवर 361 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. LKP सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांनी देखील या स्टॉकवर 288 रुपये टारगेट प्राईज जाहीर केली आहे. बीएचईएल ही भारतातील सर्वात मोठी अभियांत्रिकी आणि उत्पादन कंपन्यांपैकी एक आहे. ही कंपनी मुख्यतः डिझाईन, अभियांत्रिकी, बांधकाम, चाचणी, कमिशनिंग आणि सर्व्हिसिंग संबंधित व्यवसायात गुंतलेली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.