
Govt Employees Salary | केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. १ मार्च रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कर्मचाऱ्यांना मोठी भेट मिळू शकते. या बैठकीत जानेवारी २०२३ च्या वाढीव महागाई भत्त्याला मंजुरी मिळू शकते असं खात्रीलायक वृत्त आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांच्या खात्यात 2 महिन्यांच्या थकबाकीचे पैसेही येऊ शकतात. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा प्रमाणे 10500 रुपयांची वाढ होऊ शकते. (As Per 7th Pay Commission)
42 टक्के दराने मिळणार डीए
मीडिया रिपोर्ट्सनुसार, जानेवारी 2023 मध्ये सरकार कर्मचाऱ्यांना 42 टक्के दराने डीए देऊ शकते. मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकार वाढीव महागाई भत्त्याची घोषणा करू शकते. एआयसीपीआयच्या आकडेवारीवरून मिळालेल्या माहितीनुसार, यावेळी महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ होऊ शकते.
10500 रुपये पगार कसा वाढणार?
सातव्या वेतन आयोगांतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनावर महागाई भत्ता मोजला जातो. जर कोणत्याही कर्मचाऱ्याचे मूळ वेतन 25,000 रुपये असेल तर त्याच्या वेतनात 42 टक्के डीए दराने दरमहा 10500 रुपयांची वाढ होईल. तर एखाद्या कर्मचाऱ्याचा बेसिक पगार 18000 रुपये असेल तर त्याच्या पगारात दरमहा 7560 रुपयांची वाढ होईल.
लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांना होणार फायदा
52 लाख केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा लाभ मिळणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांना ३८ टक्के दराने महागाई भत्ता मिळत आहे. यावेळी सरकारने ४ टक्के वाढ केल्यास कर्मचाऱ्यांना ४२ टक्के दराने महागाई भत्ता मिळणार आहे.
जुलैमध्ये महागाई भत्त्यातही ४ टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती
कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ केल्यास महागाई भत्ता ४२ टक्क्यांपर्यंत पोहोचेल. जुलै 2022 मध्ये सरकारने कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 4 टक्के वाढ केली होती. महागाई भत्ता आणि डीआर मध्ये वाढ केल्याने लाखो केंद्रीय कर्मचारी आणि पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.