
GTL Infra Share Price | जीटीएल इंफ्रा या पेनी स्टॉकमध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. मागील काही दिवसात तेजीत व्यवहार करणाऱ्या जीटीएल इंफ्रा स्टॉकमध्ये आज नफा वसुली पाहायला मिळत आहे. मागील 17 दिवसात या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ( जीटीएल इंफ्रा कंपनी अंश )
13 जून 2024 रोजी हा स्टॉक 5 टक्क्यांच्या घसरणीसह 2.05 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. त्यानंतर हा स्टॉक सतत 5-5 टक्क्यांच्या अप्पर सर्किटमध्ये व्यवहार करत होता. आज सोमवार दिनांक 8 जुलै 2024 रोजी जीटीएल इंफ्रा स्टॉक 5.08 टक्के घसरणीसह 3.92 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
जीटीएल इंफ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये LIC, बँक ऑफ बडोदा, ICICI बँक यासारख्या दिग्गज कंपन्यांनी गुंतवणूक केली आहे. परकीय गुंतवणूकदारांनी देखील हा पेनी स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला आहे. मार्च 2024 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग पॅटर्ननुसार जीटीएल इंफ्रा कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 3.28 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. युनियन बँक ऑफ इंडियाने जीटीएल इंफ्रा कंपनीचे 12.07 टक्के भाग भांडवल धारण केले आहे.
यासह सेंट्रल बँक ऑफ इंडियाने या कंपनीचे 7.36 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकेने 5.23 टक्के, आयसीआयसीआय बँकेने 3.81 टक्के, कॅनरा बँकेने 4.05 टक्के, बँक ऑफ बडोदाने 5.68 टक्के, भाग भांडवल धारण केले आहे. सर्व बँकांनी मिळून जीटीएल इंफ्रा कंपनीचे 39.50 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. याशिवाय एलआयसीने देखील जीटीएल इंफ्रा कंपनीचे 3.33 टक्के भागभांडवल धारण केले आहेत. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सचा जीटीएल इंफ्रा कंपनीतील वाटा 0.12 टक्के आहे.
जानेवारी-मार्च 2024 मध्ये जीटीएल इंफ्रा कंपनीला 214.6 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. तर मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा निव्वळ तोटा 755.9 कोटी रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर 2023 च्या तिमाहीत जीटीएल इंफ्रा कंपनीचा तोटा 194.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2024 तिमाहीत या कंपनीने 334.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीचा महसूल 341.7 कोटी रुपयेवर पोहचला होता. मार्च 2023 तिमाहीत कंपनीने 393.7 कोटी रुपये कमाई केली होती.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.