 
						GTL Infra Share Price | जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या पेनी स्टॉक कंपनीच्या शेअरमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील एक महिन्यापासून या स्टॉकमध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनपासून जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक बॅक-टू-बॅक अप्पर सर्किट्स हीट करत आहे. गुरुवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 5 टक्के वाढीसह 3.12 रुपये किमतीवर पोहचला होता. ( जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी अंश )
मागील 14 ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 100 टक्के वाढले आहे. अवघ्या 14 दिवसात जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 1.49 रुपयेवरून वाढून सध्याच्या किमतीवर पोहचला आहे. शुक्रवार दिनांक 28 जून 2024 रोजी जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक 4.82 टक्के वाढीसह 3.26 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे. भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसीने देखील जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉकमध्ये गुंतवणूक केली आहे.
एलआयसी कंपनीने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे 3.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या शेअर्समध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने 12.07 टक्के, सेंट्रल बँक ऑफ इंडियाने 7.36 टक्के, बँक ऑफ बडोदाने 5.68 टक्के, इंडियन ओव्हरसीज बँकने 5.23 टक्के, कॅनरा बँकने 4.05 टक्के, आणि ICICI बँकेने 3.33 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. प्रवर्तकांनी या कंपनीचे 3.28 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत.
जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक आपल्या 5 दिवस, 10 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस, 200 दिवसाच्या एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग अॅव्हरेज वर ट्रेड करत आहेत. या स्टॉकचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स 88.76 अंकावर आहे. जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर या स्मॉल कॅप कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,995.87 कोटी रुपये आहे. मागील एका आठवड्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 26.27 टक्के नफा कमावून दिला आहे.
मागील दोन आठवड्यात हा स्टॉक 38.60 टक्के वाढला आहे. तर 2024 या वर्षात शेअरची किंमत तब्बल 119 टक्के वाढली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 272 टक्के वाढवले आहेत. मागील 5 वर्षात हा स्टॉक 292 टक्के वाढला आहे. GTL इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुख्यतः वायरलेस टेलिकॉम ऑपरेटरद्वारे सामायिक केलेले टेलिकॉम टॉवर आणि कम्युनिकेशन स्ट्रक्चर्स बांधकाम आणि व्यवस्थापित करण्याचे काम करते. या कंपनीकडे भारतातील सर्व 22 दूरसंचार मंडळांमध्ये 26,000 टॉवर्सचा पोर्टफोलिओ आहे. सेबीने जीटीएल इन्फ्रास्ट्रक्चर स्टॉक अल्पकालीन ASM-स्टेज-1 मध्ये ठेवला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		