13 December 2024 3:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर मालामाल करणार, मजबूत कमाई होणार, टार्गेट नोट करा - NSE: TATATECH SBI Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, SBI फंडाच्या 'या' योजनेत SIP करा, खात्यात 1.31 कोटी रुपये जमा होतील EPF Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला EPFO ची जास्तीत जास्त किती पेन्शन मिळेल; अर्ली पेन्शन नियम काय सांगतो Vedanta Share Price | मल्टिबॅगर वेदांता शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: VEDL Mutual Fund SIP | SIP चे 'हे' योग्य नियम पाळा आणि बंपर परतावा मिळवा, अशा पद्धतीने नियोजन करा फायदा होईल EPFO Passbook | तुमच्या पगारातून EPF कापला जातोय, आता EPF खात्यातील पैसे ATM वरून काढा, सहज शक्य होणार, नवे नियम IPO GMP | स्वस्त IPO येतोय रे, शेअर प्राईस बँड 35 रुपये, पहिल्याच दिवशी मालामाल करणार, GMP संकेत - GMP IPO
x

GTL Infra Share Price | GTL इंफ्रा पेनी स्टॉक चिंता वाढवतोय, झटपट पैसे दुप्पट केल्यानंतर घसरण सुरु, पुढे काय?

GTL Infra Share Price

GTL Infra Share Price | मागील काही दिवसांपासून तेजीत धावणाऱ्या जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार नफा वसुली पाहायला मिळत आहे. या कंपनीच्या पेनी स्टॉकने अल्पावधीत आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. मात्र आता हा स्टॉक सतत लोअर सर्किट हीट करत आहे. ( जीटीएल इन्फ्रा कंपनी अंश )

अवघ्या 17 दिवसात जीटीएल इन्फ्रा कंपनीच्या पेनी स्टॉकने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले होते. आज बुधवार दिनांक 10 जुलै 2024 रोजी जीटीएल इन्फ्रा स्टॉक 5.11 टक्के घसरणीसह 3.53 रुपये किमतीवर क्लोज झाला आहे.

जीटीएल इन्फ्रा स्टॉक 13 जून 2024 रोजी 5 टक्क्यांनी घसरला होता. त्यानंतर या स्टॉकने सलग दोन आठवडे 5-5 टक्क्यांचा अप्पर सर्किट हीट केला आहे. शुक्रवार दिनांक 5 जुलै रोजी जीटीएल इन्फ्रा स्टॉक 4.15 रुपये किमतीवर पोहोचला होता. या कंपनीच्या शेअर्समध्ये एलआयसी, बँक ऑफ बडोदा, आयसीआयसीआय बँक यासारख्या दिग्गज संस्थांनी गुंतवणूक केली आहे. एवढेच नाही तर परकीय गुंतवणूकदारांनी देखील हा स्टॉक मोठ्या प्रमाणात खरेदी केला आहे.

मार्च 2014 तिमाहीच्या शेअरहोल्डिंग डेटानुसार जीटीएल इन्फ्रा कंपनीमध्ये प्रवर्तकांनी 3.28 टक्के भाग भांडवल धारण केले होते. या कंपनीमध्ये युनियन बँक ऑफ इंडियाने 12.07 टक्के भाग भांडवल धारण केले आहेत. तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाने जीटीएल इन्फ्रा कंपनीचे 7.36 टक्के भागभांडवल धारण केले आहेत. इंडियन ओव्हरसीज बँकेने देखील या कंपनीचे 5.23 टक्के भागभांडवल धारण केले आहे.

जीटीएल इन्फ्रा कंपनीमध्ये आयसीआयसीआय बँकेने 3.81 टक्के, कॅनरा बँक-मुंबईने 4.05 टक्के, बँक ऑफ बडोदाने 5.68 टक्के भागभांडवल धारण केले आहेत. या कंपनीच्या शेअर्समध्ये विविध व्यापारी बँकांनी एकूण 39.50 टक्के वाटा होल्ड केला आहे. याशिवाय एलआयसी सारख्या दिग्गज सरकारी विमा कंपनीने देखील जीटीएल इन्फ्रा स्टॉकमध्ये 3.33 टक्के भागभांडवल धारण केले आहे. फॉरेन पोर्टफोलिओ इन्व्हेस्टर्सनी या कंपनीचे 0.12 टक्के भागभांडवल होल्ड केले आहेत.

जर तुम्ही जीटीएल इन्फ्रा कंपनीची मागील 11 तिमाहीची आर्थिक कामगिरी पहिली तर तुम्हाला समजेल की, ही कंपनी दीर्घ काळापासून तोट्यात व्यवसाय करत आहे. मात्र तरीही अनेक दिग्गजांनी या कंपनीमध्ये मोठी गुंतवणूक केली आहे. या काळात कंपनीचा महसुल फारसा न बदलता 330-400 कोटी रुपये दरम्यान राहिला आहे. मार्च 2023 तिमाहीत या कंपनीचा निव्ळ तोटा 755.9 कोटी रुपये नोंदवला गेला होता. तर जानेवारी-मार्च 2024 तिमाहीत जीटीएल इन्फ्रा कंपनीला 214.6 कोटी रुपये निव्वळ तोटा सहन करावा लागला होता. यावरून कळते की, कंपनीच्या तोट्यात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.

डिसेंबर 2023 तिमाहीत जीटीएल इन्फ्रा कंपनीचा तोटा 194.6 कोटी रुपये नोंदवला गेला होता. मार्च 2024 तिमाहीत हा कंपनीने 334.5 कोटी रुपये महसूल संकलित केला होता. तर डिसेंबर 2023 तिमाहीत कंपनीची कमाई 341.7 कोटी रुपये नोंदवली गेली होती. मार्च 2023 तिमाहीत जीटीएल इन्फ्रा कंपनीने 393.7 कोटी रुपये महसूल कमाई केली होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | GTL Infra Share Price NSE Live 10 July 2024.

हॅशटॅग्स

#GTL Infra Share Price(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x