20 May 2024 4:02 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल? NMDC Share Price | PSU NMDC स्टॉकला तज्ज्ञांची 'BUY' रेटिंग, अल्पावधीत मोठी कमाई, किती फायदा होईल? Tata Motors Share Price | तज्ज्ञांकडून टाटा मोटर्स शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राइस जाहीर JP Power Share Price | 19 रुपयाचा शेअर खरेदीला ऑनलाईन गर्दी, यापूर्वी दिला 680% परतावा, संधी सोडू नका Rattan Power Share Price | हा शेअर श्रीमंत बनवणार! प्राईस 13 रुपये, 1 महिन्यात दिला 60% परतावा, खरेदी करा Gold Rate Today | कसं परवडणार? आज सोन्याचा भाव खूप महाग झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Penny Stocks | चिल्लर प्राईस टॉप 10 पेनी स्टॉक, अल्पावधीत मालामाल करणारा परतावा मिळू शकतो
x

Bharat Bijlee Share Price | विजेच्या वेगात पैसा येतोय! भारत बिजली शेअरने अल्पावधीत 700% परतावा दिला, बिग-बुल सुद्धा खरेदी करत आहेत

Bharat Bijlee Share Price

Bharat Bijlee Share Price | भारतीय शेअर बाजारात असे अनेक स्टॉक आहेत, ज्यानी आपल्या गुंतवणुकदारांना मोठ्या प्रमाणात नफा कमावून दिला आहे. असे काही शेअर्स असतात ज्यावर दिग्गज गुंतवणुकदार देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करत असतात. आणि त्यामुळे किरकोळ गुंतवणुकदार देखील अशा दिग्गज गुंतवणूकदारांचे अनुसरण करत असतात.

आज या लेखात आपण भारत बिजली कंपनीच्या स्टॉक बद्दल जाणून घेणार आहोत, ज्यात धरे बाजारातील दिग्गज गुंतवणुकदार आशिष कचौलिया यांनी देखील मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. आज सोमवार दिनांक 9 ऑक्टोबर 2023 रोजी भारत बिजली कंपनीचे शेअर्स 2.17 टक्के घसरणीसह 3,759.50 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

भारत बिजली या कंपनीने मागील 1 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. आणि मागील 6 महिन्यात देखील या कंपनीच्या शेअरची कामगिरी मजबूत राहिली आहे. मागील 6 महिन्यात भारत बिजली कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 45 टक्के परतावा कमावून दिला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी 2023 या वर्षांच्या सुरूवातीला भारत बिजली कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढले आहेत.

मागील एका वर्षात भारत बिजली कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 97 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारत बिजली कंपनीचे शेअर्स 4 टक्क्यांच्या वाढीसह 3842.65 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

मागील महिन्यातच भारत बिजली कंपनीने आपल्या पात्र गुंतवणूकदारांना 40 रुपये लाभांश वाटप केला होता. कोविड दरम्यान या कंपनीने जबरदस्त कामगिरी केली होती. मागील 3 वर्षात भारत बिजली कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 700 टक्के नफा कमावून दिला आहे.

या 3 वर्षांत भारत बिजली कंपनीचे शेअर्स 498 रुपयेवरून वाढून ते 3850 रुपये किमतीवर पोहचले आहेत. भारतीय शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार आशिष कचोलिया यांनी देखील भारत बिजली कंपनीच्या शेअरमध्ये जून 2023 च्या तिमाहीत 1.79 टक्के भाग भांडवल धारण केले होते.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Bharat Bijlee Share Price today on 09 October 2023.

हॅशटॅग्स

Bharat Bijlee Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x