27 July 2024 10:53 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

EMS Limited IPO | सुवर्ण संधी! ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO पहिल्याच दिवशी 60 टक्के परतावा देऊ शकतो, करणार खरेदी?

EMS Limited IPO

EMS Limited IPO | सध्या गुंतवणुकीसाठी ओपन असलेल्या ईएमएस लिमिटेड कंपनीच्या IPO ला गुंतवणूकदारांनी भरघोस प्रतिसाद दिला आहे. या कंपनीचे IPO शेअर्स ग्रे मार्केटमध्ये 125 रुपये प्रीमियम किमतीवर ट्रेड करत आहेत.

पहिल्याच दिवशी 60 टक्के नफा मिळू शकतो

ईएमएस लिमिटेड कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअरची इश्यू किंमत 200-211 रुपये प्रति शेअर जाहीर केली होती. जे हा स्टॉक ग्रे मार्केटमध्ये प्रिमियम किंमत टिकवून ठेवण्यात यशस्वी झाला तर कंपनीचे शेअर्स 336 रुपये किमतीवर सूचीबद्ध होऊ शकतात. म्हणजेच गुंतवणुकदारांना पहिल्याच दिवशी 60 टक्के नफा मिळू शकतो.

मागील आठवड्यात शुक्रवारी गैर संस्थात्मक आणि किरकोळ गुंतवणूकदारांनी मजबूत बोली लावण्याने ईएमएस लिमिटेड कंपनीचा IPO 3.71 पट अधिक सबस्क्राईब झाला होता. या कंपनीच्या IPO ला 1,07,87,431 शेअर्सच्या तुलनेत 4,00,47,140 शेअरची बोली मिळाली आहे.

गैर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 5.97 पट अधिक खरेदी झाला आहे. तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा राखीव कोटा 4.72 पट खरेदी झाला आहे. आणि पात्र संस्थात्मक खरेदीदारांचा राखीव कोटा 9 टक्के खरेदी झाला आहे.

ईएमएस लिमिटेड कंपनीने आपल्या IPO अंतर्गत 146.24 कोटी रुपये मूल्याचे फ्रेश शेअर जारी केले आहेत. याशिवाय 82,94,118 इक्विटी शेअर्स ऑफर फॉर सेल अंतर्गत खुल्या बाजारात विकले जाणार आहेत. IPO इश्यूपूर्वी कंपनीने अँकर गुंतवणूकदारांकडून 96.37 कोटी रुपये भांडवल उभारणी केली होती.

EMS कंपनीच्या IPO वर तज्ञांनी सकारात्मक भावना व्यक्त केल्या आहेत. ही कंपनी इन्फ्रा आणि बांधकाम कंपन्यांसह संयुक्त उपक्रम आणि भागीदारीत व्यवसाय करते. या कंपनीच्या IPO ला तज्ञांनी ‘सबस्क्राइब’ टॅग देऊन गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला आहे.

अरिहंत कॅपिटल फर्मच्या तज्ञांच्या मते, 15 जुलै 2023 पर्यंत कंपनीच्या ऑर्डर बुकचा आकार 17,449.2 दशलक्ष आहे. ही कंपनी सध्या 5 अब्ज रुपये मूल्याचा एका प्रकल्पावर बोली लावन्याची तयारी करत आहे. आणि पुढे देखील कंपनी तर्फे 15 अब्ज ते 20 अब्ज रुपये मूल्याच्या विविध प्रकल्पांसाठी बोली लावण्याची प्रक्रिया सुरू आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | EMS Limited IPO for investment on 11 September 2023.

हॅशटॅग्स

EMS Limited IPO(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x