
GTL Infra Vs Nila Infra Share | निला इन्फ्रास्ट्रक्चर या रिअल इस्टेट क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीला श्री इन्फ्राकॉन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने एक मोठी ऑर्डर दिली आहे. या ऑर्डरची बातमी प्रसारित होताच निला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज देखील हा स्टॉक अप्पर सर्किटमध्ये ट्रेड करत आहे. निला इन्फ्रा शेअर्स आज 4.83 टक्के वाढीसह 7.60 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
ऑर्डर तपशील
नीला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला अहमदाबाद शहरात रामापीर नो टेक्रो, वडाज याठिकाणी 1,694 निवासी फ्लॅटचे बांधकाम करण्याचे काम मिळाले आहे. या ऑर्डरचे एकूण मूल्य 101.64 कोटी रुपये आहे. कंपनीला हा प्रकल्प पुढील 18 महिन्यांत पूर्ण करायचा आहे. आणि कंपनीला पुढील 10 वर्षासाठी प्रकल्पाचे देखभालीचे काम सुध्दा देण्यात आले आहे. ऑगस्ट 2023 मध्ये निला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला परवडणाऱ्या घरांचे बांधकाम करण्याचे मंजुरी पत्र गुजरात हाउसिंग बोर्डाने जारी केले आहे. या ऑर्डर अंतर्गत निला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला 17.94 कोटी रुपयेमध्ये 48 परवडणारे फ्लॅट्स बांधायचे आहे.
शेअरची कामगिरी
निला इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 30 नोव्हेंबर 2022 रोजी 8.65 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. तर 29 मार्च 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 4.23 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या नीचांक किंमत पातळीवर ट्रेड करत होते. या कंपनीचे शेअर्स सध्या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीपेक्षा 22.54 टक्के खाली ट्रेड करत आहेत.
52 आठवड्यांच्या नीचांक किंमत पातळीच्या तुलनेत शेअरची किंमत 58.39 टक्के वाढली आहे. या कंपनीच्या शेअरमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे, कारण 29 सप्टेंबर 2023 रोजी कंपनीची वार्षिक सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे.
GTL Infra Share Price
काल शुक्रवार दिनांक 7 सप्टेंबर 2023 रोजी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 6.25 टक्के वाढीसह 0.85 रुपयांवर ट्रेड करत होते. या कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 60 पैसे होती. तर उच्चांक किंमत पातळी 1.80 रुपये होती. आज शुक्रवार दिनांक 8 सप्टेंबर 2023 रोजी GTL इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचे शेअर्स 16.67 टक्के वाढीसह 1.05 रुपयांवर ट्रेड करत आहेत.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.