5 May 2024 9:50 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 06 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे सोमवारचे राशिभविष्य | 06 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा सोमवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Senior Citizen Saving Scheme | ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीम की बँक FD? अधिक फायदा कुठे जाणून घ्या OnePlus Nord CE 4 Lite | वनप्लसचा नवीन स्वस्त स्मार्टफोन, 50MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, प्राईस जाणून घ्या CIBIL Score | पगारदारांनो! कमी क्रेडिट स्कोअरमुळे कोणताही लोन मिळणार नाही, झटपट असा सुधारू शकता क्रेडिट स्कोअर Motorola Edge 50 Ultra | मोटोरोलाचा नवा स्मार्टफोन धुमाकूळ घालणार, 50MP सेल्फी कॅमेरा, 125W फास्ट चार्जिंग मिळणार Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर
x

Investment Scheme | या योजनेत दररोज फक्त 29 रुपये जमा करून 4 लाख रुपये परतावा मिळवा, नफ्याच्या योजनेबद्दल जाणून घ्या

Investment scheme

Investment scheme| आपल्या चांगल्या भविष्यासाठी आणि आर्थिक जीवनासाठी गुंतवणूक करणे ही नेहमीच एक सर्वोत्तम कल्पना असते. भारतीय लोकांकडे गुंतवणुकीचे भरपूर पर्याय उपलब्ध आहेत. विमा हा त्यापैकीच एक गुंतवणूक पर्याय आहे. जीवन विमा असणे म्हणजे तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भविष्य सुरक्षित असणे होय. जीवन विमा हा गुंतवणुकीच्या जोखीममुक्त पद्धतींपैकी एक असा सुरक्षित गुंतवणूक पर्याय आहे. LIC जिवन विमा भारतीय लोकांमध्ये विम्यासाठी अत्यंत लोकप्रिय असा गुंतवणूक पर्याय आहे. कारण जीवन विमा मध्ये त्यात गुंतवणूक करण्यासाठी अनेक योजना उपलब्ध आहेत. एलआयसी आधार शिला योजना ही एक नॉन-लिंक्ड, सर्वसमावेशक, वैयक्तिक, जीवन विमा योजना आहे जी खास महिला आणि लहान मुलींसाठी तयार करण्यात आली होती. या पॉलिसी योजने अंतर्गत, जर तुम्ही दररोज फक्त 29 रुपये गुंतवले तर तुम्हाला त्यावर परतावा म्हणून 4 लाख रुपये मिळू शकतात.

LIC आधार शिला योजना ही योजना आर्थिक संरक्षण आणि बचत यांचे गुण प्रदान करते. आणि मुदतपूर्तीपूर्वी कोणत्याही वेळी पॉलिसीधारकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबासाठी आर्थिक मदत देखील दिली जाते. या पॉलिसीमध्ये हयात असलेल्या पॉलिसीधारकाला मुदतपूर्तीच्या वेळी परतावा म्हणून एकरकमी पूर्ण रक्कम दिली जाते. तसेच, या योजनेतून ऑटो कव्हर तसेच कर्ज सुविधाही दिली जाते.

किमान विमा रक्कम :
या पॉलिसी अंतर्गत किमान मूळ विम्याची रक्कम प्रति जीवन 75000 रुपये आहे. तर LIC आधार शिला योजनेअंतर्गत कमाल मूळ विमा रक्कम 3 लाख रुपयेपेक्षा जास्त असू शकत नाही. याचा अर्थ LIC आधार शिला पॉलिसीमध्ये कमाल गुंतवणूक मर्यादा रक्कम 3 लाख रुपये आहे. या पॉलिसीचा परिपक्वता कालावधी 10 वर्ष ते 20 वर्षांपर्यंत आहे. विमा प्रीमियम मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक आधारावर जमा करता येतो.

LIC आधार शिला योजना :
या योजनेत गुंतवणूक केल्यावर मॅच्युरिटीवर 4 लाख रुपये कसे मिळवायचे हे आपण एक उदाहरणावरून समजून घेऊ. जर तुम्ही दररोज 29 रुपये बचत केली तर एका वर्षात तुम्ही LIC आधार शिला योजनेत 10,959 रुपये जमा करू शकता. समजा तुमचे वय 20 वर्षे आहे, आणि तुम्ही जर वयाच्या 30 व्या वर्षीपर्यंत या योजनेत गुंतवणूक केली तर,या काळात तुमची गुंतवणूक 2,14,696 रुपयांची असेल. व्याजासह परतावा जोडून तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर तब्बल 3,97,000 रुपये परतावा मिळेल. LIC आधार शिला योजनेत 8 ते 55 वर्षे वयोगटातील कोणतीही महिला या योजनेत गुंतवणूक करून योजनेचा लाभ घेऊ शकते. एलआयसीने आपल्या वेबसाइटवर माहिती दिली आहे की ही योजना कोणत्याही वैद्यकीय तपासणीशिवाय, सर्व सामान्य निरोगी जीवनासाठी उपलब्ध आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Investment scheme LIC Aadhaar Shila Policy benefits on 11 September 2022.

हॅशटॅग्स

#Investment Scheme(36)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x