 
						HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या संरक्षण क्षेत्रात व्यवसाय करणाऱ्या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना मजबूत परतावा कमावून दिला आहे. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 2499 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.
आज देखील या कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स सध्या 52 आठवड्यांच्या उच्चांक पातळीवर ट्रेड करत आहेत. आज सोमवार दिनांक 4 डिसेंबर 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड स्टॉक 1.46 टक्के वाढीसह 2,498.15 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
भारतीय संरक्षण अधिग्रहण परिषदेने नुकताच भारतीय संरक्षण दलाच्या मजबुतीसाठी 2.23 लाख कोटी रुपये निधी मंजूर केला आहे. हा निधी भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्करासाठी हेलिकॉप्टर तसेच तेजस लढाऊ विमाने खरेदी करण्यासाठी खर्च केला जाणार आहे.
भारत सरकार ही खरेदी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीकडून करणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, फिलीपिन्स सरकारने एचएएल कंपनीकडून 12 ते 15 हलकी प्रगत हेलिकॉप्टर खरेदी करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे. हा करार देखील 2200 कोटी ते 2500 कोटी रुपये मूल्याचा असू शकतो.
एचएएलला कंपनीला ही नवीन ऑर्डर मिळाली तर, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कंपनीच्या व्यवसायाच्या दृष्टीने ही खूप मोठी झेप असेल. मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 3.35 टक्क्यांच्या वाढीसह 2462.15 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.
मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 70 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. मागील एका महिन्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरची किंमत 32 टक्क्यांनी वाढली आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		