
HAL Share Price | 25 नोव्हेंबर 2023 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेजस या हलक्या लढाऊ विमानातून गगनभरारी घेतली होती. मोदींच्या या तेजस उड्डाणानंतर एचएएल कंपनीचे शेअर्स देखील गगनभरारी घेऊ लागले आहे. या स्वदेशी लढाऊ विमानाची निर्मिती हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड म्हणजेच एचएएल कंपनीने केली होती.
तेजस हे भारतीय बनावटीचे हलके आणि मल्टीरोल लढाऊ जेट विमान आहे. तेजस विमान एक आसनी आणि एक जेट इंजिन असलेले विशेष लढाऊ विमान आहे. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी एचएएल स्टॉक 0.50 टक्के घसरणीसह 2,701.10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
भारतीय संरक्षण संपादन परिषदेने देशाच्या सशस्त्र दलांची ऑपरेशनल क्षमता वाढविण्यासाठी 2.23 लाख कोटी रुपये निधी मंजूर केला होता. त्यानंतर 6 डिसेंबर रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 2754.15 रुपये या सर्वकालीन उच्चांक किमतीवर पोहोचले होते. संरक्षण परिषदेने एचएएल कंपनीकडून हलके लढाऊ हेलिकॉप्टर आणि लढाऊ विमान MK 1A-तेजस खरेदी करण्याची घोषणा केली आहे. या सकारात्मक बातमीमुळे एचएएल कंपनीचे शेअर्स 2737.75 रुपये किमतीवर पोहचले होते.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने मागील 5 दिवसांत 18 टक्क्यांची वाढ नोंदवली आहे. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 41 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 60 टक्क्यांपेक्षा जास्त वाढली आहे. 2023 या वर्षात एचएएल कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. जर तुम्ही 5 वर्षापूर्वी एचएएल स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.18 लाख रुपये झाले असते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.