 
						HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी कंपनीने नुकताच कोचीन शिपयार्ड कंपनीसोबत एक करार संपन्न केला आहे. या कराराचे एकूण मूल्य 1173.42 कोटी रुपये आहे. एचएएल कंपनी या करारामध्ये नेक्स्ट जनरेशन मिसाईल वेसल प्रकल्पांतर्गत भारतीय नौदलाला सुटे भाग आणि पार्टसचा पुरवठा करणार आहे. या ऑर्डर्सची पूर्तता आर्थिक वर्ष 2025-26 ते 2028-29 पर्यंत पूर्ण करायची आहे. गुरुवार दिनांक 28 मार्च 2024 रोजी एचएएल कंपनीचे शेअर्स 1.83 टक्क्यांच्या वाढीसह 3,341 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
एचएएल कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 3,428 रुपये होती. मागील एका वर्षात या सरकारी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 146.86 टक्के परतावा कमावून दिला आहे. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने डिसेंबर 2023 तिमाहीत निव्वळ नफ्यात जबरदस्त वाढ साध्य केली होती. वार्षिक आधारावर डिसेंबर 2023 तिमाहीत एचएएल कंपनीच्या नफ्यात 22.87 टक्के वाढ नोंदवली गेली होती.
डिसेंबर 2023 तिमाही कालावधीत एचएएल कंपनीचा एकत्रित नफा वार्षिक आधारावर 940 कोटी रुपयेवरून वाढून 1155 कोटी रुपये नोंदवला गेला होता. या सरकारी कंपनीच्या उत्पन्नात किंचित घट पाहायला मिळाली होती. वार्षिक आधारावर एचएएल कंपनीचे महसूल संकलन 5890 कोटी रुपयेवरून कमी होऊन 5666 कोटी रुपये नोंदवले गेले होते.
डिसेंबर 2023 तिमाहीत एचएएल कंपनीचा EBITDA वार्षिक आधारावर 1428 कोटी रुपयेवरून कमी होऊन 985 कोटी रुपये नोंदवला गेला होता. डिसेंबर तिमाहीत या कंपनीचा EBITDA मार्जिन 24.3 टक्के वरून घसरून 17.3 टक्के नोंदवला गेला होता.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		