15 December 2024 4:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा
x

Stocks To Buy | हे 5 शानदार स्टॉक, तज्ञांचा खरेदीचा सल्ला दिला, टार्गेट प्राईस पहा आणि पैसे लावा

Stock to Buy

Stocks To Buy | भारतीय शेअर बाजारात मागील काही आठवड्यापासून सुधारणा होत आहे. थोडाफार विक्रीचा दबाव जगातील सर्व स्टॉक मार्केटमध्ये दिसून येत आहे, पण काळजीचे काही कारण नाही. ब्रोकरेज फर्म मोतीलाल ओसवाल यांनी गुंतवणूकदारांसाठी काही धमाकेदार स्टॉक निवडले आहेत, जे भविष्यात लोकांना बक्कळ पैसा कमावून देऊ शकतात. या ब्रोकरेज फर्मचे म्हणणे आहे की गुंतवणूकदारांनी या शेअर्समधे बिनधास्त गुंतवणूक करावी. हे स्टॉक सध्या तेजीत आले असून ते 14 ते 45 टक्क्यांपर्यंत नफा कमावून देऊ शकतात हे नक्की.

ब्रिगेड एंटरप्रायझेस :
ब्रिगेड एंटरप्रायझेस ही एक मिड-कॅप स्टॉक कंपनी आहे. या कंपनीचे शेअर्स सध्या 495 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे. या कंपनीचे बाजार भांडवल 11,415 कोटी रुपये आहे. ब्रिगेड एंटरप्रायझेस कंपनी ही रिअल इस्टेट क्षेत्रात उद्योग करत असून या कंपनीच्या शेअरने मागील 5 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना 178 टक्केपेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीच्या शेअर्ससाठी 720 रुपये टार्गेट किंमत निश्चित केली असून स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या स्टॉकमध्ये गुंतवणूक केल्यास हा स्टॉक पुढील काळात 45 टक्के नफा कमावून देऊ शकतो.

भारत फोर्ज :
भारत फोर्ज या कंपनीचे शेअर सध्या 853 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. सध्या या कंपनीचे मार्केट कॅप 39,732 कोटी रुपये आहे. या कंपनीच्या स्टॉकने मागील ३ वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 93 टक्के परतावा कमावून दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने या कंपनीच्या शेअर्सबाबत सकारात्मक मत व्यक्त केले आहे. मोतीलाल ओसवाल फर्म ला अपेक्षा आहे की, हे स्टॉक पुढील काळात 985 रुपये लक्ष्य किंमत स्पर्श करू शकतात. म्हणून तज्ञांनी हा स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महानगर गॅस :
महानगर गॅस कंपनीचे शर्सा सध्या 898 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मोतीलाल ओसवाल फर्म यांनी महानगर गॅस कंपनीच्या शेअरसाठी 1,025 रुपये ही लक्ष्य किंमत निश्चित केली आहे. फर्मने हा स्टॉक बाय रेटिंग देऊन स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना 11 टक्के पेक्षा अधिक परतावा मिळवून दिला आहे.

मणप्पुरम फायनान्स :
मणप्पुरम फायनान्स ही एक मिड कॅप कंपनी असून या कंपनीचे शेअर्स 116 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. या कंपनीच्या समभागाने मागील 5 वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना 23 टक्के परतावा कमावून दिला आहे. कंपनीचे बाजार भांडवल सध्या 9856 कोटी रुपये आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने स्टॉक मार्केटमधील गुंतवणूकदारांना 140 रुपये लक्ष किमतीसाठी स्टॉक खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

लेमन ट्री हॉटेल्स :
ही एक मिड कॅप स्टॉक कंपनी असून या कंपनीचे शेअर्स 91 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मागील 1 वर्षात या कंपनीच्या समभागाने लोकांना 59 टक्के परतावा कमावून दिला आहे. मोतीलाल ओसवाल फर्मने लेमन ट्री हॉटेल्स कंपनीच्या शेअर्सवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 110 रुपये या लक्ष किमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| List of Stock to buy recommended by Motilal Oswal brokerage firm for short term return on investment on 17 November 2022.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x