
HAL Share Price | एचएएल म्हणजेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त अस्थिरता पाहायला मिळत आहे. ही अस्थिरता आगामी बजेटमुळे निर्माण झाली आहे. सोमवारी या सरकारी कंपनीचे शेअर्स 5 टक्क्यांच्या वाढीसह 5000 रुपयेच्या पार गेले होते. आज हा स्टॉक किंचित वाढीसह ट्रेड करत आहे. ( हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी अंश )
मागील आठवड्यात शेवटच्या तीन दिवसात एचएएल स्टॉक 13 टक्क्यांनी घसरला होता. 9 जुलै रोजी एचएएल स्टॉकने 5674 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2024 रोजी एचएएल स्टॉक 2.51 टक्के घसरून 4,872 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.
सध्या एचएएल स्टॉक आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किमतीवरून 17 टक्क्यांनी कमजोर झाला आहे. तज्ञांच्या मते, ज्या गुंतवणूकदारांनी हा स्टॉक होल्ड केला आहे, त्यांनी शेअरमध्ये 4300 रुपये किमतीवर स्टॉपलॉस लावणे आवश्यक आहे. ब्रोकरेज हाऊसच्या तज्ञांच्या मते, हा स्टॉक अल्पावधीसाठी 5500 रुपये किंमत स्पर्श करू शकतो. एचएएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांक किंमत पातळी 1767.95 रुपये होती. या कंपनीचे एकूण बाजार भांडवल 3,34,223.65 कोटी रुपये आहे.
मागील 1 वर्षात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 159 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 66.30 टक्के वाढवले आहेत. मागील एका महिन्यात या कंपनीच्या शेअर्सची किंमत 3.4 टक्के घसरली आहे. भारत सरकारने या कंपनीचे 71.60 टक्के भागभांडवल धारण केले आहे. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी या कंपनीचे शेअर्स 7.86 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. FII ने या कंपनीचे 11.68 टक्के भागभांडवल धारण केले आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.