
HAL Share Price | बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी शेअर बाजारात हलकी तेजी पाहायला मिळाली होती. स्टॉक मार्केट सेन्सेक्स १०० अंकांनी वधारला होता. तर मार्केट एनिफ्टीमध्ये २५ अंकांची किरकोळ वाढ पाहायला मिळाली होती. दरम्यान, शेअर बाजार तज्ज्ञ सुमीत बगडिया यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी स्टॉकसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. तसेच हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअरसाठी टार्गेट प्राईस देखील जाहीर केली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअरची सध्याची स्थिती
बुधवार, 01 जानेवारी 2025 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअर 0.30 टक्क्यांनी घसरून 4,166 रुपयांवर पोहोचला होता. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 5,674.75 रुपये होता, तर हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर 2,748.45 रुपये होता. हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे एकूण मार्केट कॅप सध्या 2,78,575 कोटी रुपये आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर टार्गेट प्राईस
शेअर बाजार तज्ज्ञ सुमीत बगडिया यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी खरेदीचा सल्ला दिला आहे. सुमीत बगडिया यांनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग सह 4400 ते 4700 रुपये टार्गेट प्राईस जाहीर केली आहे. स्टॉक मार्केट तज्ज्ञ सुमीत बगडिया यांच्या मते हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी शेअर गुंतवणूकदारांना मजबूत परतावा देऊ शकतो. सध्या या कंपनीवर केवळ 0.37 लाख रुपयांचे कर्ज शिल्लक आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स कंपनी शेअरने किती परतावा दिला
मागील ५ दिवसात हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर 1.79% घसरला आहे. मागील १ महिन्यात हा शेअर 7.57% घसरला आहे. मागील ६ महिन्यात हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअर 22.80% घसरला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 47.33% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअरने 1,030.13% परतावा दिला आहे. लॉन्ग टर्ममध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स शेअरने 635.13% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 47.33% परतावा दिला आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.