12 April 2021 6:37 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश

अमृत फार्माचे तरुण संचालक शैलेश जोशींची आत्महत्या

बेळगाव : अमृत फार्माचे तरुण संचालक शैलेश जोशींनी त्यांच्या राहत्या घरी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळ्या झाडून काल रात्री आत्महत्या केली आहे. वय वर्ष चाळीस असताना एका तरुण तडफदार उद्योजकाने आत्महत्या केल्याने उद्योग जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

आत्महत्येच्या कारणाचा पोलीस सध्या तपास करत आहेत. शैलेश जोशी यांचे वडील शरद जोशी हे बेळगावचे माजी नगराध्यक्ष होते. तसेच शैलेश जोशी यांनी सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करून, त्यांच्या राजकीय प्रवासाला सुरुवात केली होती.

रात्री उशिरा म्हणजे दीड वाजण्याच्या सुमारास गोळ्या झाडल्याचा आवाज शेजारील लोकांना आल्याने त्यांनी पोलिसांना पाचारण केलं. अखेर शैलेश जोशी यांनी त्यांच्या राहत्या घरी छातीवर गोळी झाडून आत्महत्या केल्याचे उघड झाल.

हॅशटॅग्स

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x