14 December 2024 6:57 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्स 'पॉवर' दाखवू लागले, शेअर्स उच्चांक पातळीवर, शेअरमध्ये प्रचंड तेजी, फायदा घेणार?

Adani Power Share Price

Adani Power Share Price | अदानी समूहाचा भाग असलेल्या कंपन्याचे शेअर्स जोरदार तेजीत धावत आहेत. बुधवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी ग्रुपमधील कंपन्यांचे शेअर्स 20 टक्क्यांच्या वाढीसह ट्रेड करत होते. तर आज देखील या कंपन्याचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी केले जात आहेत. अमेरिकन शॉर्ट सेलिंग फर्मच्या अहवालानंतर अदानी समूहाचे शेअर्स कोसळले होते.

मात्र आता US International Development Finance Corporation ने एक निवेदन जाहीर करून माहिती दिली आहे की, गौतम अदानी यांच्या समूहावर हिंडेनबर्ग रिसर्चद्वारे करण्यात आलेले आरोप खोटे निघाले आहेत. म्हणून अदानी समूहाचे शेअर्स पुन्हा एकदा तेजीत आले आहेत. आज गुरूवार दिनांक 7 डिसेंबर 2023 रोजी अदानी पॉवर स्टॉक 0.52 टक्के वाढीसह 563.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

अदानी समुहाच्या कंपन्यांनी आता 14 लाख कोटी रुपये बाजार भंडवलाचा टप्पा पार केला आहे. बुधवारी अदानी ग्रुपचा भाग असलेल्या सर्व लिस्टेड कंपन्यांचे एकत्रित बाजार भांडवल 14.65 लाख कोटी रुपये नोंदवले गेले होते. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनच्या तुलनेत अदानी समूहाच्या कंपन्यांच्या बाजार भांडवलात 1.93 लाख कोटी रुपयेची भर पडली आहे. नुकताच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत तीन राज्यांमध्ये भाजपने बहुमत मिळवले आहे. त्यांनतर अदानी समूहाच्या शेअर्समध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणांत खरेदी पाहायला मिळत आहे.

कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये अदानी टोटल गॅस कंपनीचे शेअर्स 20 टक्के वाढीसह 1053.80 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर वाढ झाली आहे. अदानी पोर्ट्स कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 1082.95 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

अदानी एंटरप्रायझेस कंपनीच्या शेअरने कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 3000 रुपये किंमत पातळी ओलांडली होती. तर अदानी पॉवर कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा जास्त वाढीसह 589.30 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. सध्या अदानी पॉवर कंपनीच्या शेअर्सनी आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Adani Power Share Price NSE 07 December 2023.

हॅशटॅग्स

#Adani Power Share Price(62)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x