14 December 2024 7:24 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Happiest Minds Technologies Share Price | कमाईची संधी! या शेअरने 425% परतावा दिला, आता अजून 40% परतावा देईल, खरेदी करणार?

Stock To Buy

Happiest Minds Technologies Share Price |‘ हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स सलग 6 दिवसांच्या घसरणीनंतर कालच्या ट्रेडिंग सेशन मध्ये किंचित वाढले होते. मात्र बुधवार दिनांक 25 जानेवारी 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 1.44 टक्के कमजोरीसह 864. 10 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत. मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये BSE निर्देशांकावर या आयटी कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 884.95 रुपयांवर क्लोज झाले होते. मागील 5 महिन्यांत हॅपीएस्ट माइंड्स कंपनीच्या शेअर्समध्ये आलेली ही सर्वात मोठी उसळी होती. हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स पुढील काळात जबरदस्त वाढू शकतात असे तज्ञांचे मत आहे. या कंपनीचे शेअर्स आजपर्यंतच्या सर्वात यशस्वी आयटी स्टॉकपैकी एक मानला जातो. (Stock Market LIVE, Share Market LIVE, BSE – NSE LIVE, Nifty 50 LIVE, Sensex LIVE, SGX Nifty live, Happiest Minds Technologies Share Price | Happiest Minds Technologies Stock Price | BSE 543227 | NSE HAPPSTMNDS)

कंपनीचे IPO तपशील :
या कंपनीने आपल्या IPO मध्ये शेअर्सची इश्यू किंमत 166 रुपये निश्चित केली होती. सध्या या कंपनीचे शेअर्स 800 रुपयेच्या पार गेले आहे. 17 सप्टेंबर 2020 रोजी ‘हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज’ कंपनीचे शेअर्स स्टॉक मार्केटमध्ये सूचीबद्ध झाले होते. हॅपीएस्ट माइंड्स कंपनीच्या आयपीओला गुंतवणूकदारांनी अप्रतिम प्रतिसाद दिला होता. या कंपनीचा IPO 151 पट सबस्क्राइब झाला होता. लिस्टिंगच्या पहिल्याच दिवशी या आयटी कंपनीचे शेअर्स 123.5 टक्के वाढीसह 371 रुपयांवर क्लोज झाले होते.

कंपनीच्या शेअरची कामगिरी :
या कंपनीच्या शेअरची उच्चांक किंमत पातळी 1580 रुपये होती. जर तुम्ही या कंपनीच्या शेअर्सचे चार्ट पॅटर्न पाहिले तर तुम्हाला समजेल की, या कंपनीचे शेअर्स आपल्या IPO इश्यू किंमतीच्या तुलनेत 425 टक्के वाढीसह ट्रेड करत आहेत. स्टॉक लिस्टिंग झाल्याच्या 10 महिन्यांच्या आत हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 1,580 रुपये या आपल्या सर्वकालीन उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते. 15 मार्च 2022 रोजी या कंपनीच्या शेअर्सने 1,240 रुपये ही आपली 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी स्पर्श केली होती. तेव्हापासून आतापर्यंत या कंपनीचे शेअर्स डाउनट्रेंडमध्ये खाली जात आहेत आणि शेअरची किंमत 30 टक्के पडली आहे.

भारतीय ब्रोकरेज फर्म ‘केआर चोक्सी’ ने हॅपीएस्ट माइंड्स टेक्नॉलॉजीज कंपनीचे शेअर्स 1,158 रुपये या लक्ष्य किंमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच पुढील काळात या कंपनीचे शेअर्स 40 टक्के वर जाऊ शकतात असा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीमध्ये या कंपनीने 57.58 कोटी रुपये कमाई केली होती. तर कंपनीच्या नफ्यात मागील वर्षीच्या तुलनेत 17.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Happiest Minds Technologies Share Price 543227 HAPPSTMNDS stock market live on 25 January 2023.

हॅशटॅग्स

#Stock To BUY(240)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x