Hardwyn India Share Price | ‘हार्डविन इंडिया’ शेअरने गुंतवणूकदारांचे पैसे गुणाकारात वाढवले, बोनस शेअर्स आणि स्टॉक स्प्लिटने श्रीमंत केलं

Hardwyn India Share Price | ‘हार्डविन इंडिया’ कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर कमाई करून दिली आहे. अवघ्या एका वर्षात ‘हार्डविन इंडिया’ कंपनीच्या शेअरने आपल्या शेअर धारकांना 137 टक्के नफा कमावून दिला आहे. आता कंपनीच्या संचालक मंडळाने शेअर्सचे विभाजन करून बोनस शेअर जारी करण्याचा निर्णय घेतला आहे. (Hardwyn India Share Price Today)

‘हार्डविन इंडिया’ कंपनीने 1 : 3 या प्रमाणात बोनस शेअर्स आणि 1 : 10 या प्रमाणात स्टॉक स्प्लिट करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. सोमवार दिनांक 22 मे 2023 रोजी ‘हार्डविन इंडिया’ कंपनीचे शेअर्स 2.65 टक्के वाढीसह 377.95 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत. (Hardwyn India Share Price NSE)

स्टॉक स्प्लिट अंतर्गत ‘हार्डविन इंडिया’ कंपनी आपला 1 शेअर 10 तुकड्यांमध्ये विभाजित करणार आहे. याशिवाय शेअर धारकांना बोनस शेअर्स अंतर्गत प्रत्येक तीन शेअर्सवर एक बोनस शेअर मोफत दिला जाणार आहे. ‘हार्डविन इंडिया’ कंपनीने अद्याप रेकॉर्ड तारीख जाहीर केली नाही. शेअर धारकांच्या अंदाजानुसार रेकॉर्ड डेट सोमवार दिनांक 5 जून 2023 रोजी असण्याची शक्यता आहे. मागील शुक्रवारी, हार्डविन इंडिया कंपनीचे शेअर्स 1.19 टक्क्यांच्या वाढीसह 369 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. (Hardwyn India Share Price BSE)

कंपनीची आर्थिक कामगिरी :
हार्डविन इंडिया ही कंपनी मुख्यतः स्थापत्य शास्त्रीय हार्डवेअर आणि काचेच्या फिटिंग्जचे उत्पादन करण्याचा व्यवसाय करते. यासोबत कंपनी निवासी आणि व्यावसायिक संरचनांसाठी संपूर्ण सेवा प्रदान करते. हार्डविन इंडियाचे एकूण बाजार भांडवल 962.66 कोटी रुपये आहे. कंपनीची निव्वळ विक्री FY22 च्या तिसऱ्या तिमाहीत 30 टक्क्यांनी वाढली होती.

Q3FY23 मध्ये कंपनीच्या निव्वळ नफ्यात 230.30 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. FY22 मध्ये कंपनीची निव्वळ विक्री 47.37 टक्क्यांनी वाढली होती, तर निव्वळ नफ्यात FY21 च्या तुलनेत 50 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.

स्टॉकची कामगिरी : Hardwyn India Share Price Return History
हार्डविन इंडिया कंपनीच्या शेअरने मागील एका वर्षात शेअर धारकांना अप्रतिम नफा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत कंपनीच्या शेअर्समध्ये 15 टक्क्यांची मजबूत वाढ पाहायला मिळाली आहे. 2023 या वर्षात कंपनीचे स्टॉक 9 टक्के वाढले आहेत.

मागील एका वर्षभरात ‘हार्डविन इंडिया’ कंपनीच्या शेअर्सने लोकांना 137 टक्के परतावा दिला आहे. एप्रिल 2022 पासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्सची किंमत 319 टक्क्यांनी मजबूत झाली आहे. एप्रिल 2022 मध्ये ‘हार्डविन इंडिया’ कंपनीच्या शेअरची किंमत 88 रुपये होती, जी आता वाढून 369 रुपये झाली आहे.

हार्डविन इंडिया शेअरची अंदाजित किंमत २०२५ – Hardwyn India Share Price Prediction 2025
सर्व विश्लेषण आणि उद्दिष्टे आणि तांत्रिक अंदाजित विश्लेषणावर आधारित आहे. विविध पद्धतींचा वापर करून टार्गेट प्राईस निश्चित केली जाते. 2025 साठी हार्डविन इंडिया शेअर प्राइस टार्गेट रु.610-623 असेल. मात्र त्यासाठी इतर आर्थिक गोष्टी देखील सकारात्मक असणं गरजेचं आहे.

News Title | Hardwyn India Share Price today on 22 May 2023.