
HCC Share Price | हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीच्या संचालक मंडळाने शनिवारी राइट इश्यूद्वारे 350 कोटी रुपये भांडवल उभारणी करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. कंपनीच्या राइट्स इश्यू कमिटीने 21 रुपये प्रति शेअर किमतीवर 766,666,666 इक्विटी शेअर्स राईट इश्यूच्या माध्यमातून जारी करण्यास मंजुरी दिली आहे. ( हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनी अंश )
हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने सेबीला दिलेल्या माहिती म्हंटले आहे की, राईट इश्यूनंतर या कंपनीचे पेड-अप इक्विटी शेअर 151,30,28,244 वरून वाढून 167,96,94,910 वर जाणार आहे. आज सोमवार दिनांक 15 एप्रिल 2024 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 3.05 टक्के घसरणीसह 36.60 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.
मागील आठवड्यात शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर्स 1.98 टक्के घसरणीसह 37.72 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर आज देखील या स्टॉकमध्ये मजबूत विक्रीचा दबाव पाहायला मिळत आहे. 2 फेब्रुवारी 2024 रोजी हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीचे शेअर 46 रुपये या आपल्या 52 आठवड्याच्या उच्चांक किमतीवर ट्रेड करत होते. तर 18 एप्रिल 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 13.54 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या नीचांक किमतीवर ट्रेड करत होते.
डिसेंबर 2023 तिमाहीत हिंदुस्तान कन्स्ट्रक्शन कंपनीने 182.30 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर मागील वर्षी याच तिमाहीत कंपनीला 257.85 कोटी रुपये तोटा सहन करावा लागला होता. 31 डिसेंबर 2023 रोजी संपलेल्या तिमाहीत कंपनीची विक्री वार्षिक 8.6 टक्के वाढीसह 1,474.47 कोटी रुपये नोंदवली गेली होती.
हिंदुस्तान कंन्ट्रक्शन कंपनी मुख्यतः अभियांत्रिकी आणि बांधकाम, वाहतूक, वीज आणि पाणी पायाभूत सुविधा या क्षेत्रात व्यवसाय करते. मार्च 2024 पर्यंत कंपनीच्या प्रवर्तकांनी कंपनीचे 18.59 टक्के भाग भांडवल धारण केले होते. तर सार्वजनिक गुंतवणूकदारांनी कंपनीचे 81.41 टक्के भाग भांडवल धारण केले होते.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.