4 May 2025 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IREDA Share Price | फक्त विचार करू नका, फायद्याचे निर्णय घ्या, हा शेअर ठरू शकतो फायद्याची गुंतवणूक - NSE: IREDA JP Power Share Price | वडापाव पेक्षाही स्वस्त पेनी स्टॉक, मोठी अपडेट, यापूर्वी 1927% परतावा दिला - NSE: JPPOWER Vikas Lifecare Share Price | चिल्लर प्राईस पेनी स्टॉकबाबत महत्वाची अपडेट; स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: VIKASLIFE HUDCO Share Price | पैसे गुंतवावे तर अशा शेअर्समध्ये, पोर्टफोलिओ भक्कम करा, मोठा परतावा मिळेल - NSE: HUDCO Ashok Leyland Share Price | कमाल होईल जर खरेदी कराल हा मल्टिबॅगर स्टॉक, पैशाने पैसा वाढेल - NSE: ASHOKLEY Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK
x

HCL Tech Share Price | एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीने केलेल्या कराराच्या पार्श्वभूमीवर शेअर तेजीत, भरवशाचा आहे शेअर

HCL Tech Share Price

HCL Tech Share Price | शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये भारतीय शेअर बाजारात जबरदस्त उलाढाल पाहायला मिळाली होती. शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात विक्रीचा दबाव पाहायला मिळाला होता. एवढा विक्रीचा दबाव असूनही एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स मोठ्या प्रमाणात खरेदी होत होते. शुक्रवारच्या एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर 4.4 टक्क्यांच्या वाढीसह 1,185.55 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

या कंपनीच्या शेअरमध्ये अचानक एवढी वाढ होण्याचे कारण म्हणजे, एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीने आपल्या व्यावसायिक ग्राहकांचे नेटवर्क व्यवस्थापित करण्यासाठी Verizon Communications कंपनीसोबत 2.1 अब्ज डॉलर्सचा करार केला आहे. व्हेरिझॉन ही कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीला नेटवर्किंग पॉवर सोल्यूशन्स आणि स्केलची जोडणी करून वायरलाइन सेवा वितरण करणार आहे.

व्हेरिझॉन बिझनेस कंपनीचा ग्लोबल कस्टमर ऑपरेशन्स ग्रुप HCL टेक कंपनीमध्ये सामील होणार आहे. एचसीएल टेक्नॉलॉजी आणि व्हेरिझॉन या दोन्ही कंपन्यांनी केलेल्या 2.1 अब्ज डॉलर मूल्याच्या कराराचा फायदा कंपनीला नोव्हेंबर 2023 मिळायला सुरुवात होईल. पुढील 6 वर्षांत या कराराचा सकारात्मक परिणाम कंपनीच्या महसूलावर पाहायला मिळेल. शुक्रवार दिनांक 11 ऑगस्ट 2023 रोजी एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 2.93 टक्के वाढीसह 1,167.55 रुपये किमतीवर क्लोज झाले होते.

शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये या कंपनीचे शेअर्स 1160 रुपये किमतीवर ओपन झाले होते. तर दिवसभरात हा स्टॉक 1188.95 रुपये किमतीवर पोहचला होता. 5 जुलै 2023 रोजी एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीचे शेअर्स 1202.70 रुपये या आपल्या 52 आठवड्यांच्या उच्चांक किंमत पातळीवर पोहचले होते.

मागील सहा महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत फक्त 4.90 टक्के वाढली आहे. तर YTD आधारे या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 12.32 टक्के नफा कमावून दिला आहे. मागील एका वर्षात एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 22.08 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 5 वर्षांत एचसीएल टेक्नॉलॉजी कंपनीच्या शेअरची किंमत 133 टक्क्यांनी वाढली आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HCL Tech Share Price today on 12 August 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

HCL Tech Share Price(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या