2 May 2025 2:26 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC Suzlon Share Price | स्वस्त आणि मस्त शेअर, खरेदी करून होल्ड करून ठेवा, संयम आयुष्य बदलू शकतं - NSE: SUZLON Rattan Power Share Price | 10 रुपयांचा पेनी स्टॉक फोकसमध्ये, मिळेल मजबूत अपसाईड परतावा - NSE: RTNPOWER
x

HDIL Share Price | HDIL शेअर्स दररोज 5 टक्के अप्पर सर्किट हीट करत आहेत, नेमकं कारण काय?

HDIL Share Price

HDIL Share Price | हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना अक्षरशः श्रीमंत केले आहे. मागील 9 ट्रेडिंग सेशनपासून या कंपनीचे शेअर्स सतत अप्पर सर्किट हीट करत आहेत. आज देखील या कंपनीचे शेअर्स अप्पर सर्किटमध्ये अडकले होते. आज 13 फेब्रुवारी 2024 रोजी कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत डिसेंबर तिमाहीच्या निकालांची घोषणा करण्यात आली आहे. आज मंगळवार दिनांक 13 फेब्रुवारी 2024 रोजी हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे शेअर्स 4.50 टक्के वाढीसह 5.80 रुपये किमतींवर क्लोज झाले आहेत.

2008 मध्ये एचडीआयएल कंपनीचे शेअर्स 1100 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. त्यानंतर हा स्टॉक तब्बल 99 टक्के घसरला. सध्या ही कंपनी दिवाळखोरी प्रक्रियेला सामोरे जात आहे. शेठ डेव्हलपर्स आणि सनटेक रियल्टी यांसारख्या दिग्गज कंपन्यांसह 25 मोठ्या संस्थांनी एचडीआयएल कंपनी खरेदी करण्यास स्वारस्य दाखवले आहे. काही मीडिया रिपोर्टनुसार गौतम अदानी यांच्या मालकीच्या अदानी प्रॉपर्टीज कंपनीने देखील एचडीआयएल कंपनी खरेदी करण्याची ईच्छा व्यक्त केली आहे.

पीएमसी बँक घोटाळ्याच्या चौकशीत एचडीआयएल कंपनीची भूमिका संशयास्पद आढळली होती. या प्रकरणी कंपनीचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन यांना तुरुंगाची वारी करावी लागली होती. आणि त्यांच्या काही मालमत्तेची जप्ती देखील करण्यात आली होती. तथापि, नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनलच्या मुंबई खंडपीठाने बँक ऑफ इंडियाच्या याचिकेवर एचडीआयएल कंपनीच्या विरुद्ध दिवाळखोरी प्रक्रिया सुरू केली. एचडीआयएल या रिॲल्टी कंपनीवर तब्बल 522 कोटी रुपये कर्ज थकबाकी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | HDIL Share Price NSE Live 13 February 2024.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#HDIL Share Price(6)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या