12 December 2024 3:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Share Price | एनटीपीसी ग्रीन कंपनीचा शेअर फोकसमध्ये, रॉकेट तेजीचे संकेत, संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN Top Mutual Fund | शेअर्स नको, मग या टॉप 15 म्युच्युअल फंडांच्या SIP मध्ये पैसे गुंतवावा, दरवर्षी 64 टक्क्याने पैसा वाढवा Penny Stocks | 2 रुपयाचा शेअर श्रीमंत करू शकतो, खरेदीला गर्दी, यापूर्वी 379 टक्के परतावा दिला - Penny Stocks 2024 IPO GMP | आला रे आला स्वस्त IPO आला, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये शेअरचा धुमाकूळ - GMP IPO Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स
x

Spicejet Share Price | शेअरची किंमत 63 रुपये, स्पाईसजेट कंपनी शेअरने दिले तेजीचे संकेत, नेमकं कारण काय?

Spicejet Share Price

Spicejet Share Price | स्पाईसजेट एअरलाईन कंपनीने Echelon Ireland Madison One कंपनीसोबत असलेल्या आर्थिक वादाचे निराकरण केले आहे. त्यामुळे स्पाईसजेट कंपनीची 48 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 398 कोटी रुपयेची बचत होणार आहे. या नवीन संमती करारानुसार स्पाईसजेट दोन एअरफ्रेम्स खरेदी करणार आहे.

ज्यामुळे स्पाईसजेट एअरलाईच्या ताफ्यात वाढ होईल आणि कंपनीची ऑपरेशनल क्षमता देखील वाढेल. स्पाइसजेट कंपनीच्या तीन वादांचा यशस्वी तोडगा निघाल्यामुळे कंपनीचे जवळपास 685 कोटी रुपये बचत झाले आहेत. गुरूवार दिनांक 7 मार्च 2024 रोजी स्पाईसजेट कंपनीचे शेअर्स 2.08 टक्के वाढीसह 63.21 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

स्पाईसजेट कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक यांनी एका निवेदनात म्हंटले आहे की, “हा करार केवळ आर्थिक विवेकाची आमची वचनबद्धता अधोरेखित करत नाही तर दोन एअरफ्रेम्सच्या खरेदीसह कंपनीचा ताफा देखील मजबूत करतो”.

28 फेब्रुवारी रोजी, स्पाइसजेट कंपनीने घोषणा केली होती की त्यांनी सेलेस्टियल एव्हिएशन कंपनीसोबत 29.9 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 250 कोटी रुपये मूल्याच्या वादाचे समाधानकारकपणे निराकरण केले आहे. यामुळे देखील स्पाईसजेट कंपनीला मोठा फायदा झाला आहे.

5 मार्च 2024 रोजी स्पाईसजेट एअरलाइन कंपनीने आपल्या निवेदनात म्हंटले की, त्यांनी विमान भाडेतत्वावर देणाऱ्या क्रॉस ओशन पार्टनर्स कंपनीसोबत 11.2 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 93 कोटी रुपये मूल्याच्या वादाचे निराकरण केले आहे. त्यामुळे कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळाली आहे. मागील सहा महिन्यांत स्पाईसजेट कंपनीच्या शेअर्सची किंमत 57 टक्क्यांनी मजबूत झाली आहे.

या वर्षी आतापर्यंत स्पाईसजेट स्टॉक फक्त 5 टक्के वाढला आहे. तर मागील एका वर्षभरात स्पाईसजेट कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 76 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे. स्पाईसजेट कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 77.50 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 22.65 रुपये होती.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Spicejet Share Price NSE Live 08 March 2024.

हॅशटॅग्स

#SpiceJet Share Price(5)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x