23 June 2024 9:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 23 जून 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Mutual Fund Scheme | कुटुंबातील लहान मुलांसाठी आहेत या खास म्युच्युअल फंड योजना, बचतीवर मोठा परतावा मिळेल Brand Rahul Gandhi | जो मै बोलता हूं, वो मैं करता हूं! काँग्रेसची सत्ता असलेल्या या राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी Lease & License Agreement | भाडेकरू कधीही तुमच्या घराचा ताबा घेऊ शकणार नाही, असा तयार करा भाडे करार RVNL Share Price | RVNL ऑर्डर बुकचा आकार अजून वाढला, स्टॉक सुसाट तेजीत वाढणार, पुन्हा मल्टिबॅगर? IREDA Share Price | PSU शेअर रिकव्हरी मोडमध्ये, स्टॉक मोठ्या टार्गेट प्राईसला स्पर्श करणार, फायदा घ्या IRB Infra Share Price | 66 रुपयाचा शेअर खरेदी करा, टेक्निकल चार्टवर मोठे संकेत, मिळणार मोठा परतावा
x

Hilton Metal Forging Share Price | 8 रुपयाचा हिल्टन मेटल फोर्जिंग शेअर, मागील 3 वर्षांत 1600 टक्के परतावा दिला, आजही होतेय खरेदी

Highlights:

  • Hilton Metal Forging Share Price
  • हिल्टन मेटल फोर्जिंग्स शेअर
  • शेअर ओव्हरबॉट ही नाही
  • मागील 6 महिन्यांत 95 टक्के परतावा
  • शेअर होल्डिंग पॅटर्न
  • मागील आर्थिक वर्षात
Hilton Metal Forging Share Price

Hilton Metal Forging Share Price | ‘हिल्टन मेटल फोर्जिंग लिमिटेड’ या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना बंपर नफा मिळवून दिला आहे. मागील तीन वर्षांत, ‘हिल्टन मेटल फोर्जिंग्स लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 1600 टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. 22 मे 2020 रोजी या कंपनीचे शेअर्स 8.69 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. तर 24 मे 2023 रोजी हा स्टॉक 155.95 रुपये किमतीवर पोहचला होता.

हिल्टन मेटल फोर्जिंग्स शेअर
ज्या गुंतवणूकदारांनी तीन वर्षापुर्वी हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीच्या शेअर्समध्ये एक लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 17 लाखपेक्षा अधिक झाले आहे. आज शुक्रवार दिनांक 26 मे 2023 रोजी हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीचे शेअर्स 0.032 टक्के वाढीसह 157.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.

शेअर ओव्हरबॉट ही नाही
हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीचे शेअर्स रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्सवर 68.6 अंकावर ट्रेड करत आहेत. याचा अर्थ स्टॉक ओव्हरबॉट ही नाही, किंवा ओव्हरसोल्ड ही नाही. हिल्टन मेटल्स कंपनीच्या शेअर्सचा बीटा 0.8 आहे, जो कमी अस्थिरता दर्शवतो. मागील एका महिन्यात या कंपनीचे शेअर्स 7.63 टक्क्यांनी कमजोर झाले आहेत.

मागील 6 महिन्यांत 95 टक्के परतावा
मागील 6 महिन्यांत या कंपनीच्या शेअरची किंमत 95 टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षी हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीच्या शेअरने लोकांना 125 टक्क्यांहून अधिक परतावा कमावून दिला आहे. मागील एका वर्षाच्या या कंपनीच्या शेअरने लोकांना 465 टक्के इतका मल्टीबॅगर परतावा कमावून दिला आहे. हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची नीचांक पातळी किंमत 22.28 रुपये होती. तर उच्चांक किंमत पातळी 155.95 रुपये होती.

शेअर होल्डिंग पॅटर्न
मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत, हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीच्या पाच प्रवर्तकांनी 28 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. आणि 11,163 सार्वजनिक गुंतवणूकदारांनी 72 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. यात 2 लाख भाग भांडवल असलेल्या 10,646 सार्वजनिक शेअर धारकांनी 59.79 लाख शेअर्स म्हणजे 28.47 टक्के भाग भांडवल होल्ड केले आहेत. 2 लाख रुपयांपेक्षा जास्त भांडवल असलेल्या केवळ 82 भागधारकांकडे 23.6 टक्के भाग भांडवल आहे.

मार्च 2023 च्या तिमाहीत हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीच्या निव्वळ नफ्यात 27 टक्क्यांची घट झाली आहे. या तिमाहीत कंपनीने एकूण 2.49 कोटी रुपये नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीने 3.41 कोटी रुपये नफा कमावला होता.

मार्च 2022 च्या तिमाहीत 33.29 कोटी रुपयांच्या तुलनेत मार्च 2023 तिमाहीत कंपनीचा एकूण सेल्स 8 टक्क्यांच्या घसरणीसह 30.66 कोटी रुपयेवर आला आहे. तथापि, मार्च 2023 ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा ऑपरेटिंग नफा 76.67 टक्क्यांच्या वाढीसह 4.77 कोटी रुपये नोंदवला गेला होता. जो मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत 2.70 कोटी रुपये नोंदवला वेळा होता.

मागील आर्थिक वर्षात
मागील आर्थिक वर्षात हिल्टन मेटल फोर्जिंग्स कंपनीची विक्री 24.59 टक्क्यांच्या वाढीसह 104.83 कोटी रुपयेवर पोहचली होती. जी मागील आर्थिक वर्षात 84.14 कोटी रुपये नोंदवली गेलो होती. FY23 मध्ये कंपनीचा निव्वळ नफा 232.95 टक्‍क्‍यांच्या वाढीसह 5.86 कोटी रुपयेवर पोहचला आहे. जो मागील आर्थिक वर्षात 1.76 कोटी रुपये होता. मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षात कंपनीचा ऑपरेटिंग नफा 157.53 टक्क्यांच्या वाढीसह 14.19 कोटी रुपये होता. जो मागील आर्थिक वर्षात 5.51 कोटी रुपये नोंदवला गेला होता.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Hilton Metal Forging Share Price today on 26 May 2023

हॅशटॅग्स

Hilton Metal Forging Share Price(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x