
HAL Share Price | हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड या सरकारी मालकीच्या संरक्षण क्षेत्रातील दिगज कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस कमाई करून दिली आहे. मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना दुप्पट नफा कमावून दिला आहे. आता या कंपनीला भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून एक मोठी वर्क ऑर्डर देण्यात आली आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीला भारतीय तटरक्षक दलाला 2 विमाने पुरवण्याची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे. आज मंगळवार दिनांक 25 जुलै 2023 रोजी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 1.29 टक्के घसरणीसह 3,835.00 रुपये किमतीवर क्लोज झाले आहेत.
सेबीला दिलेल्या माहितीत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने कळवले आहे की, भारतीय संरक्षण मंत्रालयाकडून कंपनीला 2 विमाने पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डरचे एकूण मूल्य 458.87 कोटी रुपये आहे. यासह हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने आपल्या शेअर धारकांना लाभांश वाटप करण्याची घोषणा केली आहे. आणि कंपनी आपले शेअर्स स्प्लिट देखील करणार आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनी आपले 10 रुपये दर्शनी मूल्य असलेले शेअर्स विभाजित करणार आहे. आणि कंपनी आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 15 रुपये लाभांश वाटप करणार आहे.
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीने स्टॉक स्प्लिटसाठी 29 सप्टेंबर 2023 हा दिवस रेकॉर्ड डेट म्हणून जाहीर केला आहे. शुक्रवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीचे शेअर्स 0.55 टक्क्यांच्या वाढीसह 3857.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 55.58 टक्के परतावा कमावून दिला आहे. तर मागील एका वर्षात या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणुकदारांना 103.59 टक्के नफा कमावून दिला आहे.
महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.