15 December 2024 7:16 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NHPC Share Price | मल्टिबॅगर PSU एनएचपीसी शेअर रॉकेट होणार, पुढची टार्गेट प्राईस मालामाल करणार - NSE: NHPC Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
x

RVNL Share Price | RVNL शेअर बुलेट ट्रेन स्पीडने देणार परतावा, सकारात्मक बातमीनंतर स्टॉक खरेदीला गर्दी

RVNL Share Price

RVNL Share Price | आरव्हीएनएल या सरकारी कंपनीच्या शेअर्समध्ये जबरदस्त तेजी पाहायला मिळत आहे. मागील आठवड्यात शुक्रवारी या कंपनीचे शेअर्स 7 टक्क्यांच्या वाढीसह 637 रुपये किमतीवर पोहचले होते. तर आज देखील या शेअरमध्ये जोरदार खरेदी पाहायला मिळत आहे. ( आरव्हीएनएल कंपनी अंश )

आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 647 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 119.20 रुपये होती. आज सोमवार दिनांक 22 जुलै 2024 रोजी आरव्हीएनएल स्टॉक 1.24 टक्के वाढीसह 621.35 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

मागील आठवड्यात शुक्रवारी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीने स्टॉक एक्सचेंजला माहिती दिली की, लवाद न्यायाधिकरणाने कृष्णपट्टणम रेल्वे कंपनी लिमिटेड या SPV च्या नावे 584.22 कोटी रुपये मूल्याच्या निवाड्यात निकाल दिला आहे. हा निवाडा कृष्णपट्टणम रेल्वे कंपनी या आरव्हीएनएल कंपनीच्या SPV च्या बाजूने आला आहे. त्यामुळे आरव्हीएनएल स्टॉक तेजीत वाढत आहे.

याशिवाय आरव्हीएनएल कंपनीने इस्राईलमधील युनायटेड कन्स्ट्रक्शन लिमिटेड कंपनीसोबत करार केला आहे. या करारा अंतर्गत आरव्हीएनएल कंपनीने इस्रायलमधील रेल्वे, MRTS, बोगदे, रस्ते, पूल, इमारत बांधकामे, विमानतळ, बंदरे, सिंचन, वीज पारेषण आणि वितरण क्षेत्र, सौर क्षेत्र आणि पवन क्षेत्र या क्षेत्रातील प्रकल्पांना सहकार्य देणे आणि अधिग्रहण करणे या कामासाठी करार केला आहे.

मागील एका वर्षात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 425 टक्के परतावा कमावून दिला आहे. 19 जुलै 2023 रोजी या रेल्वे कंपनीचे शेअर्स 119.90 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 19 जुलै 2024 रोजी रेल विकास निगम लिमिटेड कंपनीचे शेअर्स 637.80 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. 2024 या वर्षात आरव्हीएनएल स्टॉक आतापर्यंत 240 टक्के वाढला आहे. 2024 या वर्षाच्या सुरुवातीला आरव्हीएनएल कंपनीचे शेअर्स 182.15 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील एका महिन्यात आरव्हीएनएल कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 60 टक्क्यांपेक्षा जास्त परतावा कमावून दिला आहे.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | RVNL Share Price NSE Live 22 July 2024.

हॅशटॅग्स

RVNL Share Price(155)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x